IND vs AUS | शुबमन गिल-रोहित शर्मा जोडीचा वर्ल्ड कप फायनलमध्ये ऐतिहासिक कारनामा
Rohit Sharma Shubman Gill | रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये 30 धावांची सलामी भागीदारी केली. यासह या जोडीने मोठा कीर्तीमान केला आहे.
1 / 5
रोहित शर्मा-शुबमन गिल या जोडीने वर्ल्ड कप फायलनमध्ये इतिहास रचला आहे. रोहित -शुबमन ही जोडी वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी दुसरी जोडी ठरली आहे.
2 / 5
रोहित आणि शुबमनने 2023 या वर्षात अनेक सामन्यांमध्ये मिळून एकूण 1 हजार 523 धावांची भागीदारी केली आहे. रोहित आणि शुबमनने याबाबतीत ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ या जोडीला मागे टाकलं आहे.
3 / 5
एडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ या जोडीने 24 वर्षांपूर्वी मोठा कारनामा केला होता. या जोडीने 1999 मध्ये एकूण 1 हजार 518 धावांची भागीदारी केली होती.
4 / 5
तसेच टीम इंडियाच्या सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यो जोडीने दोनदा प्रत्येकी एका वर्षात जास्त धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला. सचिन आणि गांगुलीने 1998 मध्ये 1 हजार 635 धावा केल्या.
5 / 5
तसेच त्यानंतर 2 वर्षांनी सचिन-गांगुली जोडीने पुन्हा असा धमाका केला. सचिन आणि गांगुलीने 2000 या वर्षात एकूण 1 हजार 438 धावांची भागीदारी केली.