पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिकने काही महिन्यांपूर्वी सानिया मिर्झाला घटस्फोट दिला. त्यान सना जावेदसोबत लग्न केलं. पण अजूनही शोएब मलिक सानियाला विसरलेला नाहीय.
शोएब मलिक पूर्णपणे सानिया मिर्झाला विसरायला तयार नाहीय असच दिसतय. त्याच्या इन्स्टाग्रामवर अजूनही सानियाच्या काही आठवणी आहेत.
मुलगा इजहानशी संबंधित फंक्शनचे हे फोटो आहेत. सानिया सुद्धा या फोटोमध्ये दिसतेय. सना जावेदमुळे सानिया-शोएबचा अनेक वर्षांचा संसार मोडला.
या फोटोमध्ये सानिया शोएब-इजहानच्या मागे उभी दिसतेय. सानियापासून घटस्फोट घेण्याच्या 3 महिने आधीचा ऑक्टोबर 2023 मधला हा फोटो आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात सानिया मिर्झा-शोएब मलिकचा घटस्फोट झाला. शोएब मलिक WCL मध्ये पाकिस्तानी टीममध्ये होता. फायनलमध्ये इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तानला धूळ चारली होती.