IPL 2021: गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या तिन्ही संघात एक साम्य, ‘हे’ आहे विजयामागचं गुपीत!
आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये चेन्नई सुपरकिंग्सने सर्वात आधी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. त्यानंतर आता इतर तीन जागांसाठी उर्वरीत सात संघात चुरस आहे. ज्यामध्ये दिल्ली आणि आरसीबी संघाची स्थिती इतरांच्या तुलनेत अधिक चांगली आहे.
1 / 4
क्रिकेट एक असा खेळ आहे. ज्यात संघाची सुरुवात चांगली झाली, तर पुढचा खेळही सोपा होतो. त्यामुळे सलामीवीरांचे महत्त्व खूप असते. कारण नव्या चेंडूने खेळताना चांगला खेळ करण्याची जबाबदारी सलामीवीरांवर असते. त्यामुळे सलामीवीरांची कामगिरी चांगली असल्यास संघाची कामगिरीही चांगलीच होते. याचाच प्रत्यय सध्या सुरु असलेल्या आय़पीएलमध्ये (IPL 2021) येत आहे. कारण सध्या आय़पीएलच्या गुणतालिकेत टॉप 3 संघाचे सलामीवीर कमालीच्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे संघही उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.
2 / 4
आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा विजयी खिताब पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सने यंदाही अप्रतिम कामिगिरी करत सर्वप्रथम प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. दरम्यान त्यांनी 11 पैकी 9 सामने जिंकले असून यामागे त्यांच्या सलामीवीरांचा मोठा हात आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डु प्लेसी (Faf Dupesis) यांनी या पर्वात आतापर्यंत 599 धावांची भागिदारी केली आहे. यात गायकवाडने 11 सामन्यात 407 तर डु प्लेसीने 11 सामन्यात 435 रन केले आहेत.
3 / 4
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला दिल्ली कॅपिटल्सही प्लेऑफमध्ये जाण्यापासून एक विजय दूर आहे. दरम्यान त्यांच्या धमाकेदार खेळीमागेही सलामीवीरांची कमाल आहे. दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी या पर्वात 550 धावांची भागिदारी केली आहे. धवनने 11 सामन्यात 454 तर शॉने 10 सामन्यात 329 रन केले आहेत.
4 / 4
या दोन्ही संघानंतर गुणतालिका तिसऱ्या स्थानी असणाऱ्या विराट कोहलीच्या आरसीबी संघाचे सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt padikkal) यांंनीही धावांचा डोंगर रचला आहे. त्यांनी 475 धावांची भागिदारी केली आहे. दरम्यान विराटने 11 सामन्यात 332 रन तर पडिक्कलने 10 सामन्यात 309 केले आहेत. या संपूर्ण आकडेवारीवरुन आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे या तिघांमध्येही अधिक यशस्वी जोडी पहिल्या त्यानंतरची दुसऱ्या आणि त्यानंतरची तिसऱ्या स्थानावर आहे.