Virat Kohli ने अलिबागमध्ये विकत घेतला आणखी एक आलिशान बंगला, किंमत ऐकून विस्फारतील डोळे
Virat Kohli : महेश म्हात्रे हे आवास लिविंग विलाचे कायदेशीर सल्लागार आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट सध्या 4 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये व्यस्त आहे. मुंबईपासून स्पीड बोटने विराट कोहलीचा हा विला 15 मिनिट अंतरावर आहे.
1 / 5
विराट कोहलीने अलिबागमध्ये आणखी एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. त्याने आवासमध्ये विला खरेदी केला आहे. अलिबागमध्ये विराट कोहलीची ही दुसरी प्रॉपर्टी आहे. भारतीय स्टारचा हा विला 2000 चौरस मीटरमध्ये पसरला आहे. मांडवा जेट्टीपासून हा विला 5 मिनिटांच्या अंतरावर आहे.
2 / 5
मुंबईपासून स्पीड बोटने विराट कोहलीचा हा विला 15 मिनिट अंतरावर आहे. महेश म्हात्रे हे आवास लिविंग विलाचे कायदेशीर सल्लागार आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट सध्या 4 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये व्यस्त आहे. म्हणूनच विराटचा भाऊ विकास कोहलीने रजिस्ट्रेशनच महत्त्वाच काम केलं.
3 / 5
नवीन विलासाठी स्टॅम्प ड्युटीपोटी विराट कोहलीला 36 लाख रुपये भरावे लागले. त्याच्या नव्या बंगल्यामध्ये स्विमिंग पूल सुद्धा आहे. हा पूल 400 चौरस मीटरमध्ये पसरला आहे. कोहली आणि अनुष्का शर्माने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबागमध्ये फार्म हाऊस विकत घेतलं होतं.
4 / 5
कोहलीने मागच्यावर्षी अलिबागच्या जिराड गावात 36 हजार 59 चौरस मीटरवर पसरलेलं फार्म हाऊस विकत घेतलं. त्याची किंमत 19.24 कोटी रुपये होती. त्यावेळी 1.15 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीपोटी भरावे लागले होते.
5 / 5
कोहली सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-0 ने आघाडीवर आहे. सीरीजचा तिसरा कसोटी सामना 1 मार्चला सुरु होणार आहे.