यंदाच्या आयपीएल पर्वात अनकॅप्ड खेळाडूंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बीसीसीआय निवड करताना या खेळाडूंचा नक्कीच विचार करेल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.या खेळाडूंना लवकरच टीम इंडियात स्थान मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे.
गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साई सुदर्शनने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तामिळनाडूच्या या 21 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने फायनलमध्ये 47 चेंडूत 96 धावा केल्या. आयपीएल फायनलमध्ये ही कामगिरी करणारा सुदर्शन हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. गुजरात टायटन्सने साईला 20 लाखांच्या बेस किमतीत संघात घेतलं आहे.
यशस्वी जयस्वाल हा 22 वर्षीय डावखुरा फलंदाज राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्याने 14 सामन्यात 48.07 च्या सरासरीने 625 धावा केल्या. त्याने 13 चेंडूत एक शतक आणि अर्धशतकही झळकावले.
तिलक वर्मा हा फलंदाज मुंबई इंडियन्सचा कणा आहे. आपल्या चमकदार कामगिरीने त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्याची आक्रमक खेळी सर्वांच्या लक्षात राहिली आहे.
कोलकाता नाइड रायडर्सचा फिनिशर रिंकू सिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने 4 सामन्यात 59.25 च्या सरासरीने 474 धावा केल्या. रिंकूने गुजरात टायटन्सविरुद्ध सलग 5 षटकार मारून केकेआरला सुपर विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
मुंबई इंडियन्सचा हा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माच्या अनुपस्थितीत नेहल वढेरा संघाच्या पाठीशी उभा होता. त्याने 14 सामन्यात 26.77 च्या सरासरीने 241 धावा केल्या. त्याने शेवटच्या षटकांमध्ये फिनिशर म्हणून आपली क्षमता दाखवली आहे.