IPL 2025 मध्ये नाही दिसणार धोनीसह हे 7 खेळाडू
सध्या आयपीएल २०२४ चा सीजन सुरु आहे. जो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपणार आहे. पण या सोबतच 6 भारतीय आणि एका परदेशी खेळाडूचे करिअर ही जवळपास संपणार आहे. यामध्ये एमएस धोनीचा ही नंबर लागतो.
1 / 7
माही मार रहा है हे आपण आयपीएलमध्ये 17 वर्षांपासून सतत ऐकत आलो आहोत. पण कदाचित पुढच्या वर्षी हे ऐकायला मिळणार नाही. कारण जुलैमध्ये धोनी हा 43 वर्षांचा होत आहे. धोनीसाठी हा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असणार आहे, ज्याची घोषणा त्याने गेल्या वर्षीच केली होती.
2 / 7
IPL 2024 नंतर दिनेश कार्तिक देखील IPL मध्ये दिसणार नाहीये. त्याचा आयपीएलचा हा शेवटचा सीझन असणार आहे. असं असलं तरी तो अजून ही चांगली कामगिरी करत आहे. जर त्याची भारतीय संघात निवड झाली नाही तर तो आयपीएल 2025 मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे.
3 / 7
गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेला शिखर धवनसाठीही हा शेवटचा हंगाम असण्याची शक्यता आहे. त्याचा फिटनेस, वय आणि कामगिरी सातत्याने खालावत चालली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होत असलेल्या मेगा लिलावाव त्याला कोणी खरेदी करेल असं वाटत नाही. तो टीम इंडियातून बाहेर आहे आणि देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाही.
4 / 7
फाफ डुप्लेसिस हा गेल्या तीन वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार होता, मात्र यंदा त्याची कामगिरी घसरली आहे. त्याच्या नेतृत्वात संघाला ही चांगली कामगिरी करता आलेली नाही. तो देखील आता ४० वर्षांचा झाला आहे. हेच कारण आहे की तो आता निवृत्तीची घोषणा करू शकतो
5 / 7
पियुष चावला आता 35 वर्षांचा आहे, परंतु त्याच्या खराब तंदुरुस्तीमुळे आणि कामगिरीमुळे कदाचित आयपीएल 2024 नंतर तो या स्पर्धेत दिसणार नाही. मुंबई इंडियन्सने त्याला यंदा काही संधी दिल्या आहेत, पण तो दर्जेदार राहिलेला नाही. त्याची गुगली देखील फेल होत आहे.
6 / 7
यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा हा देखील पुढील आयपीएलपर्यंत चाळीशी ओलांडली असेल. त्याची देखील कामगिरी सतत घसरत चालली आहे आणि भारतात तरुण यष्टिरक्षकांची फौज उभी राहिली आहे. अशा स्थितीत येणाऱ्या तरुणांना संधी देण्यासाठी त्याला बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे आयपीएल 2024 हा त्याचा शेवटचा हंगाम असेल.
7 / 7
इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अमित मिश्राला लखनौ सुपर जायंट्समध्ये काही संधी मिळाल्या, पण आयपीएल 2024 मध्ये त्याने निराशा केली. भारतीय संघात आता अनेक युवा फिरकीपटू येत आहेत. त्यामुळे आता अनुभवी आणि वयोवृद्ध अमित मिश्राला पुढील हंगामात बाहेर बसावे लागणार आहे.