IND vs NZ : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कोहलीची ‘विराट’ खेळी , दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. या खेळीसह त्याने दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रमही मोडीत केलं आहे.
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने 80 धावांची खेळी करताच मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह त्याने दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे.
2 / 6
विराट कोहलीने 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 673 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह त्याने वनडे वर्ल्डकप पर्वाच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
3 / 6
सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 673 धावा, 2007 वनडे वर्ल्डकपमध्ये 659 धावा, 2019 वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने 648 धावा, तर डेविड वॉर्नरने 2019 च्या वर्ल्डकपमध्ये 647 धावा केल्या होत्या.
4 / 6
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रिकी पॉटिंगला मागे टाकलं आहे. सचिन तेंडुलकर 18426, कुमार संगकारा 14234, विराट कोहली 13717, रिकी पॉन्टिंग 13704, सनथ जयसूर्या 13430 धावा केल्या आहेत.
5 / 6
विराट कोहलीला शतकासाठी अवघ्या काही धावांची गरज आहे. शतक ठोकताच सचिन तेंडुलकरचा वनडे क्रिकेटमधील 49 शतकांचा रेकॉर्ड मोडेल. विराटच्या नावावर 50 शतकं होतील.
6 / 6
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज