WTC Final : कोणत्याही संघाला न जमलेलं काम करुन दाखवलं, कोहली सेनेकडून दमदार कामगिरीचे प्रदर्शन
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व भारतीय जोमात तयारी करत आहेत.
1 / 5
कसोटी क्रिकेटचा विश्वचषक मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship)भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team)
अप्रतिम कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत झेप घेतली आहे. दरम्यान या कामगिरीसह भारतीय खेळाडूंनी आणखी एक अप्रतिम कामगिरी केली असून WTC मध्ये
सर्वाधिक दुहेरी शतकं झळकावण्यात भारतीय खेळाडू पुढे आहेत. (Virat Kohlis Team India Only Team to Score 4 Double Centuries in World Test Championship)
2 / 5
यामध्ये सर्वांत पहिलं नाव येत सलामीवीर मयांक अगरवाल याचंय मयांकने ऑक्टोबर, 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरोधात धावांचा पाऊस पाडत
215 रन केले होते. त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील हे पहिले दुहेरी शतक होते.
3 / 5
त्यानंतर दुसरे दुहेरी शतक कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून निघाले. कोहलीने देखील
नाबाद 254 धावा केल्या होत्या. पुण्यात त्याने ही अप्रतिम खेळी केली होती.
4 / 5
तिसरा दुहेरी शतक हिटमॅन रोहित शर्माने ठोकलं. त्यानेही दक्षिण आफ्रीका संघाविरोधात ऑक्टोबर, 2019 मध्ये 212 धावा केल्या होत्या. रांचीच्या मैदानात रोहितने हे शतक जडले होते.
5 / 5
त्यानंतर पुन्हा एकदा सलामीवीर मयांक अगरवालने आणखी एक दुहेऱी शतक ठोकलं असून यावेळी त्याने 243 धावा केल्या. इंदोरमध्ये बांग्लादेश विरोधात नोव्हेंबर 2019 मध्ये
मयांकने ही कामगिरी केली होती.