IPL 2024 | हार्दिक पांड्या मुंबईकडून खेळणार असेल, तर गुजरात टायटन्सचा पुढचा कॅप्टन कोण?
IPL 2024 | पु़ढच्यावर्षी होणाऱ्या आयपीएल 2024 च्या सीजनमध्ये मोठा बदल दिसू शकतो. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सऐवजी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की असं कसं होऊ शकतं. पण क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं.
1 / 10
पुढच्यावर्षी होणाऱ्या IPL ची तयारी सुरु झाली आहे. ट्रेडिंग विंडोची वेळ संपायला काही तास बाकी आहेत. आयपीएलमधील फ्रेंचायजी आपल्या गरजेनुसार खेळाडूंची निवड करत आहेत.
2 / 10
आता बातमी अशी आहे की, डेब्युमध्येच गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणारा हार्दिक पांड्या आपली जुनी फ्रेंचायजी मुंबई इंडियन्सकडे परतणार आहे. त्याला मुंबई इंडियन्सच कॅप्टन बनवलं जाऊ शकतं.
3 / 10
हार्दिक पांड्याने दोन वर्ष गुजरात टायटन्सच नेतृत्व केलं. पहिल्यावर्षी त्याने गुजरात टायटन्सला IPL 2022 चा किताब जिंकून दिला. यावर्षी फायनलमध्ये CSK ने गुजरात टायटन्सला पराभूत केलं.
4 / 10
हार्दिक पांड्या आणि गुजरात टायटन्सच्या मॅनेजमेंटमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी होऊ शकते. हार्दिक पांड्या मुंबई टीममध्ये आल्यास MI ची ताकत नक्कीच वाढेल.
5 / 10
आता प्रश्न हा आहे की, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार असेल, तर गुजरात टायटन्सचा कॅप्टन कोण?. कारण त्यांना सुद्धा हार्दिकच्या तोडीचा खेळाडू हवा आहे.
6 / 10
हार्दिक पांड्या गेला, तरी गुजरात टायटन्स एक मजबूत टीम आहे. त्यांच्याकडे शुभमन गिल, डेविड मिलर, राशिद खान सारखे प्लेयर आहेत. एकट्याच्या बळावर हे प्लेयर मॅचची दिशा बदलू शकतात.
7 / 10
हार्दिक पांड्याचा उत्तराधिकारी म्हणून शुभमन गिलच्या नावाचा विचार होऊ शकतो. मागच्या वर्षभरापासून शुभमन गिलच्या कामगिरीत सातत्य आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत.
8 / 10
राशिद खानचा सुद्धा गुजरात टायटन्सकडे ऑप्शन आहे. राशिद खान ऑलराऊंडर आहे. शुभमन गिलबद्दल भविष्याचा विचार केल्यास राशिद खानला कॅप्टन बनवलं जाऊ शकतं
9 / 10
राशिद खानच्या अंडर शुभमन गिलला व्हाइस कॅप्टन बनवून ट्रेन केलं जाऊ शकतं. म्हणजे भविष्याच्या दृष्टीने शुभमन गिलची जडणघडण होऊ शकते. एखाद्या खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी आली की, त्याचा खेळ बदलतो. त्या दबावाखाली खेळाडूचा बहरुन जात नाही. शुभमन गिलच्या बाबतीतही फ्रेंचायजी असा विचार करु शकते.
10 / 10
शुभमन गिलने गुजरात टायटन्सच यशस्वी नेतृत्व केलं, तर बीसीसीआयला अजून एक पर्याया खुला होईल, रोहित शर्मा सुद्धा टीम इंडियाचा कॅप्टन होण्याआधी मागच्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सच नेतृत्व करतोय.