WI vs IND | रोहित-यशस्वीने बेजबॉल क्रिकेटची हवा काढली, धुवाधार बॅटिंग, टीम इंडियाच्या नावावर नवीन वर्ल्ड रेकॉर्ड
Rohit and Yashasvi Partnership | रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने सीरीजच्या तीन इनिंगमध्ये ओपनिंगला येत जबरदस्त सुरुवात दिली आहे. या दरम्यान काही रेकॉर्डही आपल्या नावावर केले आहेत.
1 / 5
भारताचा वेस्ट इंडिज दौरा टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी एका नव्या युगाच्या सुरुवातीसारखा आहे. खासकरुन ओपनिग जोडीमध्ये बदल झालाय. कॅप्टन रोहित शर्मासोबत युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल दमदार बॅटिंग करतोय. दुसऱ्या टेस्टमध्ये या दोघांनी अशी काही फलंदाजी केली की, इंग्लंडच बेजबॉल स्टाइलच क्रिकेटही फेल झालं.
2 / 5
दरम्यान, यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये असल्याने जसप्रीत बुमराह संघात असणं गरजेचं आहे. गेल्या सप्टेंबरपासून तो दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने तो मोठ्या स्पर्धांना मुकला आहे.
3 / 5
दोघांनी मिळून 11.5 ओव्हर्समध्ये 98 धावांची भागीदारी केली. पुढच्या 3 चेंडूत टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या. 12.2 ओव्हर्समध्ये 100 धावा झाल्या. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात कुठल्याही टीमने इतक्या वेगाने 100 धावा केलेल्या नाहीत. म्हणजे इंग्लंडच बेजबॉल क्रिकेट मागे राहिलं.
4 / 5
इतकच नाही, दोघांनी या सीरीजमध्ये तीन इनिंगमध्ये 229, 139 आणि 98 धावांची भागीदारी केली. एकूण 3 इनिंगमध्ये त्यांनी 466 धावा जोडल्या. परदेशात भारताच्या कुठल्याही टेस्ट सीरीजमध्ये ओपनिंग पार्ट्नरशिपचा हा नवीन रेकॉर्ड आहे.
5 / 5
भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये वेगवान बॅटिंग केली. फक्त 24 ओव्हर्समध्ये 181 धावा करुन डाव घोषित केला. भारताचा रनरेट 7.54 होता. टेस्ट क्रिकेटमध्ये हा नवीन रेकॉर्ड आहे. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या (7.53) नावावर होता. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध 241 धावा केल्या होत्या.