IND vs ENG | यशस्वीला दिग्गज गावसकर यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Yashasvi Jaiswal | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 मार्चपासून धर्मशालेत खेळवण्या येणार आहेत. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेत टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वाल याने आतापर्यंत अफलातून कामगिरी केली आहे. यशस्वीला या अखेरच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
1 / 5
यशस्वीने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 2 द्विशतकं झळकावली आहेत. यशस्वीने विशाखापट्टणममध्ये 209 आणि राजकोटमध्ये 214* धावा केल्या. यशस्वीच्या नावावर या मालिकेत आतापर्यंत एकूण 655 धावा आहेत. यशस्वीला आता 700 धावा करण्याची संधी आहे.
2 / 5
यशस्वीने या मालिकेत आतापर्यंत 23 सिक्स खेचले आहेत. यशस्वीने आणखी 3 सिक्स लगावल्यास तो इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक सिक्स लगावणारा दुसरा फलंदाज ठरेल. टीम साऊथी आणि विवियन रिचड्स या दोघांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत 25 आणि 34 सिक्स लगावले आहेत.
3 / 5
यशस्वीच्या नावावर या मालिकेतील 4 सामन्यात 655 धावा आहेत. यशस्वी आणखी 45 धावा करताच इंग्लंड विरुद्ध एका मालिकेत 700 धावा करणारा तो पहिला भारतीय ठरेल.
4 / 5
यशस्वीला लिटील मास्टर सुनील गावसकर यांचा महारेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी आहे. यशस्वीला एका कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचा विक्रम ब्रेक करण्याची संधी आहे. गावसकर यांनी विंडिज विरुद्ध 1970-71 मध्ये 774 धावा केल्या होत्या. यशस्वीला आता या विक्रमासाठी 120 धावांची गरज आहे.
5 / 5
यशस्वीने आतापर्यंत एकूण 8 कसोटी सामने खेळले आहेत. यशस्वीने आतापर्यंत 69.36 च्या सरासरीने 971 धावा केल्या आहेत. यशस्वीने या दरम्यान 2 द्विशतकं, 3 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. यशस्वीला कसोटी कारकीर्दीत 1 हजार धावांच्या टप्प्यासाठी आणखी 29 रन्सची गरज आहे.