Yashasvi Jaiswal | यशस्वीचा डबल धमाका, द्विशतकासह रेकॉर्ड्सचा पाऊस

| Updated on: Feb 03, 2024 | 12:21 PM

Yashasvi Jaiswal Double Century | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 209 धावांची खेळी केली. यशस्वीच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 396 धावांपर्यंत मजल मारली.

1 / 6
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकलं. यशस्वीने 277 बॉलमध्ये कसोटी कारकीर्दीतील पहिलीवहिली डबल सेंच्युरी ठोकली. यशस्वीने या द्विशतकासह अनेक रेकॉर्ड केले आहेत.

2 / 6
यशस्वी जयस्वाल भारतात द्विशतक करणारा सर्वात युवा ओपनर ठरला आहे. यशस्वीने वयाच्या 22 वर्ष 37 व्या दिवशी ही कामगिरी केली आहे.

3 / 6
यशस्वी टीम इंडियासाठी द्विशतक करणारा चौथा युवा फलंदाज ठरलाय. या यादीत विनोद कांबळी हा नंबर 1 आहे. कांबळीने 1993 साली इंग्लंड विरुद्ध वयाच्या 21 वर्ष 35 व्या दिवशी द्विशतक केलं होतं.

4 / 6
यशस्वी टीम इंडियासाठी द्विशतक करणारा चौथा डावखुरा फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या आधी सौरव गांगुली, विनोद कांबळी आणि गौतम गंभीर या तिघांनी ही कामगिरी केली आहे.

5 / 6
टीम इंडियासाठी कमी डावात द्विशतक करण्याबाबतही यशस्वीने विक्रम केलाय. यशस्वीने कसोटी कारकीर्दीतील 10 व्या डावात द्विशतक केलंय. तर करुण नायर याने तिसऱ्याच डावात द्विशतक केलं होतं. त्याशिवाय चेतेश्वर पुजारा याने नवव्या, सुनील गावकर यआणि मयंक अगरवाल या दोघांनी आठव्या आणि विनोद कांबळी याने चौथ्या डावातच द्विशतक केलं होतं.

6 / 6
तसेच यशस्वी टीम इंडियासाठी द्विशतक करणारा 25 वा फलंदाज ठरला आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसारख्या माजी दिग्गजांचा समावेश आहे.