Hathras Stampede : प्रायव्हेट आर्मी, डिझायनर कपडे-बूट, महागडे चश्मे, सोन्याचे घड्याळ… अशी आहे भोले बाबांची लाइफस्टाइल

| Updated on: Jul 03, 2024 | 11:22 AM

Narayan Sakar Hari aka Bhole Baba Lifestyle : उत्तर प्रदेशातील हातरसमध्ये, नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन ११६ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी मृतदेहांचा ढीग दिसू लागला या घटनेनंतर नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा चर्चेत आले आहेत. कालपर्यंत अज्ञात असलेल्या या बाबाचे रहस्य हळूहळू उघड होत आहे. प्रायव्हेट आर्मी, आश्रमता तटबंदी, डिझायनर कपडे-बूट, महागडे चश्मे, सोन्याचे घड्याळ... त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल अनेक गुपितं उघड झाल्यावर हे बाबा धर्माच्या नावाखाली धंदा चालवत होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

1 / 5
एक नाव पण ओळखी अनेक ... कधी ते स्वत:ला आयबी ऑफिसर म्हणवतात, तर कधी निवृत्त पोलिस अधिकारी. अचानक कधी बातम्या येतात की ते हेड कॉन्स्टेबल होता... भक्तांसाठी भोले बाबा आराध्य दैवत आहेत.  पण नक्की खरं काय ?

2 / 5
जेव्हा भोले बाबांचा सत्संग आयोजित केला जातो तेंव्हा त्यांची खाजगी सेवकांची फौज सत्संगाची सुरक्षा, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग, पाणी इ. सेवा आयोजित केली जाते.  ति पुरुष, हातात छडी घेऊन आणि शिट्ट्या वाजवून वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था बघत असतात.बाबांच्या आश्रमाची भव्यता आणि त्याची तटबंदी ही लक्षात घेण्यासारखी आहे. या कथित आश्रमाचे सर्व दरवाजे बंद आहेत आणि प्रत्येक दरवाजावर पहारा असतो.

3 / 5
भोले बाबा जिथे जातील तिथे त्यांच्या ताफ्यासह प्रवास करतात. सुमारे दोन डझन दुचाकीस्वार ताफ्यातून जातात, त्यानंतर महागड्या वाहनांचा ताफा येतो आणि नंतर ताफ्याच्या मागे आणखी वाहने असतात, त्यापैकी एका गाडीत बाबा उपस्थित असतात. म्हणायला ते धार्मिक गुरू आहेत, पण त्यांचा ताफा बघूनच लोक अवाक् होतात.

4 / 5
नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा यांची लाइफस्टाइल पाहून  श्रीमंतांनाही आश्चर्य वाटेल. त्यांच्याकडे कपड्यांसाठी वैयक्तिक डिझायनर आहे. इतर धार्मिक गुरूंप्रमाणे ते अंगावर भगवे कपडे घालत नाहीत किंवा त्यांच्यासारखी साधी जीवनशैलीही नाही. याउलट बाबा अतिशय टिप टॉप स्टाईलमध्ये राहतात.

5 / 5
वरपासून खालपर्यंत सदैव पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेल्या भोले बाबा यांना महागड्या चष्म्यांचा शौक आहे. त्याच्या हातात नेहमी सोन्याचे घड्याळ असते. बाबांचे कपडे आणि शूज खास डिझाइन केलेले असून बाबांनी कपड्यांसाठी वेगळा डिझायनर नेमला असल्याची माहिती समोर आली आहे.