‘ही’ ठरली सर्वोच्च महामालिका; टीआरपी स्पर्धेत मिळवलं ‘नंबर वन’ स्थान

| Updated on: Apr 05, 2024 | 11:54 AM

दर आठवड्याला मालिकांच्या टीआरपीचा रिपोर्ट येतो. गेल्या काही महिन्यांपासून जी मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय, तीच मालिका आता 'नंबर वन' ठरली आहे. या मालिकेतील जोडी हिट ठरत असून 'सर्वोच्च महामालिका' हा किताब तिने पटकावला आहे.

1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपी स्पर्धेत 'नंबर वन' पदावर आहे. ही मालिका सर्वोच्च महामालिका ठरली आहे. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी ही सर्वोत्कृष्ट जोडी ठरली आहे.

2 / 5
2022 च्या अखेरीस सुरु झालेली ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा प्रेक्षकांना खूपच आवडतेय. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

3 / 5
टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्टनुसार 'ठरलं तर मग' ही मालिका पुन्हा एकदा अग्रस्थानी आली आहे. या मालिकेचा टीआरपी 8.9 इतका आहे. यामध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली हे सायली आणि अर्जुनच्या भूमिकेत आहेत.

4 / 5
मालिका नंबर वन ठरल्याबद्दल जुई आणि अमितने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे या मालिकेच्या कथानकाचा वेग वाढवायला हवा, अशी मागणी काही प्रेक्षकांकडून होतेय.

5 / 5
पूर्ण आजी आणि अस्मिता यांची सायलीबद्दलची भावना आणखी किती दिवस दाखवणार, असा प्रश्न प्रेक्षकांनी केला आहे. त्यामुळे वाहिनीचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी वेळीच याकडे लक्ष दिलं तर टीआरपीच्या यादीत ही मालिका आपलं स्थान अढळ राखेल, यात काही शंका नाही.