‘या’ सवयी करतील तुम्हाला तणावमुक्त, फॉलो करा या टिप्स!
तणावमुक्त डोक्यासाठी काय करायला हवं? अनेक आरोग्यतज्ञ सांगतात की सकाळच्या सवयी या मेंटल हेल्थसाठी फार महत्त्वाच्या ठरतात. तुमचं सकाळी उठल्यानंतर काय रुटीन आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मानसिक आरोग्य तणावमुक्त ठेवायचं असेल तर या टिप्स फॉलो करा.
1 / 5
सकाळी लवकर उठल्यावर मन प्रसन्न, माईंड फ्रेश राहतं. पहाटे उठणं तुमच्या मानसिक आरोग्यावर चमत्कार करू शकतं. असं म्हणतात की सकाळी खूप पॉजिटिव्ह एनर्जी असते. लहानपणी सुद्धा लवकर उठून अभ्यास करा असं सांगितलं जायचं. सकाळची वेळ फ्रेश असते.
2 / 5
सकाळी उठल्यावर एकांत अतिशय गरजेचा असतो. यावेळेत तुम्ही कुणाशीही न बोलता शांत चित्ताने बसावं. योगा करू शकता, ओम मंत्रोच्चार करू शकता ज्याने तुमचं मन आणि डोकं शांत राहील. सकाळी-सकाळी जरासा एकांत लाभल्यास दिवस चांगला जातो.
3 / 5
व्यायाम करा! सकाळी उठून हालचाल करा. चालायला जा, उड्या मारा, व्यायाम करा, योगसाधना करा पण एका जागी बसून राहू नका. शरीर निरोगी राहिल्यास मन सुद्धा प्रसन्न आणि डोकं तणावमुक्त राहील त्यामुळे व्यायाम हा झालाच पाहिजे.
4 / 5
दिवसभर काय करणार आहात याची एक डायरी मेंटेन करा. या डायरीमध्ये तुमचं काय काम आहे, किती वेळेत ते व्हायला हवं, काल काय राहिलं होतं असं सगळं तुम्ही या जर्नल मध्ये लिहा. ही सवय चांगली आहे. काही दिवस करून पहा तुम्हाला फरक जाणवेल. दिवसाचं प्लॅनिंग केलं की तणाव कमी होतो.
5 / 5
डिजिटल डिटॉक्स! चुकूनही उठल्या उठल्या फोन घेऊन बसू नका. तणावग्रस्त होण्याचं पहिलं कारण वाक्य तंत्रज्ञानाचा अतिवापर. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या सगळ्यापासून सकाळी- सकाळी लांब राहा. या सवयीमुळे तुम्ही नक्कीच तणावमुक्त व्हाल.