जगभरात दर 7 मागे 1 विवाहित जोडप्याला मुल जन्माला घालण्यात समस्या जाणवत असतात. यातील ५० घटनांमध्ये पुरुषांमध्ये दोष असतो. या वाढत्या घटना कमी करण्यासाठी जपानी वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. या वैज्ञानिकांनी प्रयोग शाळेत गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या शुक्राणू पेशी विकसित केल्या आहेत. यशस्वी पद्धतीने विकसित केल्या पेशींचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार भविष्यात या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या शुक्राणू पेशीचा उपयोग ज्या पुरुषांना पालक बनण्यात अडचणी येत आहेत त्यांना उपयुक्त ठरणार आहेत.
प्रयोग शाळेत अश्या प्रकारे शुक्राणू पेशींची निर्मिती करण्यात आली. जपानमधील टोकियो युनिव्हर्ससिटीमधील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार सद्यस्थितीला हा प्रयोग उंदारांवर करण्यात आला आहे. या शुक्राणूं पेशीच्या निर्मितीसाठी सुरवातीला उंदीराच्या शरीरातील शुक्राणु काढण्यात आले. त्यावर अनेक रासायनिक प्रयोग करण्यात आले. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या शुक्राणू पेशी नर उंदरांच्या शरीरात सोडण्यात आला.
प्रयोग शाळेत विकसित करण्यात आलेल्या शुक्राणू पेशीका उंदीराच्या शरीरात सोडल्यानंतर काही वेळातच ऑक्टिव्ह झालेल्या पाहायला मिळाल्या . त्यानंतर या शुक्राणू पेशी मादी उंदराच्या अंडकोषात सोडण्यात आल्या.
लंडन येथील फ्रान्सिस क्रिक इंस्टिट्यूटमधील प्राध्यापक रॉबिन लोवेल बैजू यांच्या म्हणण्यानुसार या प्रयोगमुळे एका ना एका दिवस मानवी शुक्राणुची निर्मिती करण्यातही यश येईल. असं झाल्यास सर्वात प्रथम मानवाच्या त्वचेतील पेशींचे स्टिममध्ये कन्व्हर्ट केले जाईल.
या यशस्वी प्रयोग विचारात घेतात एक दिवस प्रयोग शाळेत निश्चितच मानवी शुक्राणूंची निर्मिती करण्यास यश येईल. यामुळे पुरुषांमध्ये असलेली नपुसंकता कमी करण्यास मदत होईल. यामुळे जगभरातील पालक बनू पाहणाऱ्या जोडप्यांना मोठा दिलासा मिळेल