तुम्ही मायग्रेनच्या झटक्याने हैराण आहात का?, मग ताबडतोब 5 गोष्टी खाणं बंद करा
मायग्रेनच्या हल्ल्यादरम्यान, तीव्र डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, आवाज आणि प्रकाशाची संवेदनशीलता असते. जर तुम्हाला मायग्रेनच्या समस्येने दीर्घकाळ त्रास होत असेल तर तुम्ही या गोष्टी खाणे टाळावे.
1 / 5
चॉकलेट - तज्ञांच्या मते, चॉकलेटमध्ये कॅफीन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन दोन्ही असते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. शिवाय, अमेरिकन मायग्रेन फाउंडेशनच्या अभ्यासानुसार, चॉकलेट हे अल्कोहोलनंतर मायग्रेनसाठी दुसरे सर्वात कारण आहे.
2 / 5
कॅफिन - बहुतेक लोक चहा आणि कॉफीचे सेवन करतात. परंतु ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ते पदार्थ टाळावे कारण या दोन्ही पेयांमधील असणाऱ्या कॅफिनमुळे मायग्रेन होऊ शकतो.
3 / 5
जूने चीज - तज्ञांच्या मते, जून्या चीजमध्ये टायरामाइन नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे मायग्रेन होऊ शकतो. फेटा, ब्लू चीज आणि परमेसनमध्ये टायरामाइन भरपूर प्रमाणात असते.
4 / 5
डब्यातील मांस - बाजारामध्ये डब्यातील मांस मोठ्या प्रमाणात मिळते. हे पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी नायट्रेट्स नावाचे संरक्षक वापरतात. एका अभ्यासानुसार, हे पदार्थ रक्तात नायट्रिक ऑक्साईड सोडतात, ज्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या पसरतात आणि डोकेदुखी आणि मायग्रेन होतात.
5 / 5
लोणचे - जुने चीज प्रमाणेच, लोणच्यामध्ये देखील टायरामाइनचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे मायग्रेनचा हल्ला होऊ शकतो.