कोण आहे हृषिकेश? संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळणार
घरोघरी मातीच्या चुली ही मालिका येत्या 18 मार्चपासून सायंकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये 'रंगा माझा वेगळा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिका साकारणार आहे.
1 / 5
येत्या 18 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ज्या हृषिकेशबद्दल इतकं भरभरुन बोललं जातंय त्या हृषिकेषची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार याची कमालीची उत्सुकता होती.
2 / 5
अखेर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे. हृषिकेशची व्यक्तिरेखा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुमीत पुसावळे साकारणार आहे. सुमीतला याआधी प्रेक्षकांनी अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय. मात्र हृषिकेश ही व्यक्तिरेखा त्याने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे.
3 / 5
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना सुमीत म्हणाला, "स्टार प्रवाह कुटुंबाचा सदस्य होतोय याचा मनापासून आनंद आहे. मी याआधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय."
4 / 5
"ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय. त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल उत्सुक आहे. या मालिकेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे. खूप चांगले कलावंत मालिकेत आहेत," असं तो पुढे म्हणाला.
5 / 5
"मालिकेत एकत्र कुटुंबाची गोष्ट दाखवली जाणार आहे. मला असं वाटतं की एकत्र कुटुंब ही रणदिवे कुटुंबाती खरी ताकद आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की एक लाकडाची काठी तोडणं सोपं आहे मात्र लाकडाची मोळी तोडणं तितकंच अवघड. त्यामुळे कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे," असा विश्वास त्याने व्यक्त केला.