Marathi News Photo gallery Suryakumar yadav on jasprit bumrah either he breaks my bat or my foot mi vs rcb ipl 2024 wankhede stadium match
Suryakumar Yadav : ‘तो माझी बॅट तोडतो किंवा पाय…’, सूर्यकुमार यादव कोणाच्या गोलंदाजीला इतका घाबरतो?
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने आयपीएल 2024 मधला दुसरा सामना खेळताना धमाका केला. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला. वानखेडेवर सूर्या नावाच वादळ रोखण हे RCB ला नाही जमलं.
1 / 10
सूर्यकुमार यादवने काल तुफानी बॅटिंग केली. मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या 19 चेंडूत 52 धावा फटकावल्या. यात 5 फोर, 4 सिक्स होते.
2 / 10
सूर्यकुमार यादव गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतो. T 20 मध्ये सूर्यासमोर कितीही मोठा गोलंदाज असला, तरी फिका पडतो. पण असाही एक जण आहे, जो सूर्यावर भारी पडतो.
3 / 10
सूर्यकुमार यादवची जेव्हा कधी त्याच्याशी भेट होते, तेव्हा तो बॅट तोडतो किंवा त्याचा पाय. कोण आहे तो?.
4 / 10
सूर्यकुमार यादवचा इशारा जसप्रीत बुमराहकडे आहे. RCB विरुद्ध मॅचनंतर सूर्यकुमार बोलला की, बुमराहला टीममध्ये पाहून खूप समाधान मिळतं.
5 / 10
जगभरातील गोलंदाजांना झोडून काढणाऱ्या सूर्यकुमार यादवने सांगितलं की, मागच्या 2-3 वर्षांपासून त्याने नेट्समध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर सराव केलेला नाहीय.
6 / 10
सूर्यकुमार यादवने यामागच कारण सुद्धा सांगितलं. बुमराह समोरुन गोलंदाजी करताना बॅट किंवा पाय तुटण्याचा धोका असतो.
7 / 10
सूर्यकुमार यादवने RCB विरुद्ध तुफानी फलंदाजी केली. त्याने T20 करिअरमधील वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याने 17 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली.
8 / 10
सूर्यकुमार यादवच्या आधी जसप्रीत बुमराहने आपल्या भन्नाट बॉलिंगच कौशल्य दाखवलं. RCB विरुद्ध त्याने 21 धावा देऊन 5 विकेट काढले.
9 / 10
सूर्यकुमार यादव T20 स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. सूर्यकुमारने शेवटचा 2022 मधला T20 वर्ल्ड कप गाजवला होता.
10 / 10
टीम अडचणीत असताना फलंदाजीला आल्यानंतर सूर्यकुमार दबाव घेत नाही. उलट तो प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांवर हल्ला चढवतो. सूर्यकुमारच्या या धक्क्यातून सावरण भल्या भल्या गोलंदाजांना जमत नाही.