करियरच्या उच्च शिखरावर असताना सुशांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल सत्य अद्याप समोर आलेलं नाही. पण जेव्हा 'मीटू' या मोहिमेने भारतात जोर धरला होता, तेव्हा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते.
'मीटू' या मोहिमेदरम्यान अनेक क्षेत्रातील महिलांनी त्यांच्यावर झालेले अत्याचार समोर आणले. याचदरम्यान सुशांतवर देखील अनेक आरोप करण्यात आले होते. ज्यामुळे अभिनेता पूर्णपणे खचला होता. आरोपांमुळे फक्त सुशांत अडचणीत नव्हता, तर अभिनेत्याच्या संपर्कात असलेले लोकंही अडचणीत होती.
'मीटू' या मोहिमेदरम्यान सुशांत त्याचा शेवटचा सिनेमा 'दिल बेतारा' ची शुटिंग करत होता. सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री संजना सांघी महत्त्वाच्या भूमिकेत होती. २०१८ मध्ये सुशांतने संजनावर अत्याचार केल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तेव्हा सुशांत तुफान चर्चेत आला होता.
पुढे कुशाल झावेरी म्हणाले, 'माझ्या लक्षात आहे, तेव्हा सुशांत चार रात्र झोपू शकला नव्हता. पाचव्या दिवशी जेव्हा संजनाने सांगितलं, सुशांतवर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत... तेव्हा सुशांतने मोकळा श्वास घेतला.' तेव्हा देखील अभिनेता तुफान चर्चेत आला.
सुशांतवर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल मुलाखतीत संजना म्हणाली, 'मी आणि सुशांत रंगत असलेल्या चर्चांमुळे त्रस्त होतो.' शिवाय 'माझ्यावर कोणतेही अत्याचार झाले नाहीत...' असं देखील संजना सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाली होती. 'दिल बेचारा' सिनेमा सुशांतच्या निधनानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांचं सिनेमाला भरभरुन प्रेम मिळालं.