Marathi News Photo gallery Sushil kumar Shinde relative veer pahariyas special gift to hardik pandya after ipl 2022 title win
सुशील कुमार शिंदेंच्या नातवाने हार्दिक पंड्याला दिलं खास गिफ्ट, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो
पहिल्याच सीजनमध्ये गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवल्यामुळे गुजरात टायटन्सचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. स्पर्धेआधी हार्दिक पंड्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
1 / 5
पहिल्याच सीजनमध्ये गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवल्यामुळे गुजरात टायटन्सचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. स्पर्धेआधी हार्दिक पंड्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण आता त्याने फक्त ऑलराऊंडरच नाही, तर कॅप्टन म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
2 / 5
हार्दिकला या विजयासाठी एक खास गिफ्ट मिळालं आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहाडिया यांनी गुजरात टायटन्सच्या लोगोच्या डिझाइनमध्ये बनवलेलं एक लॉकेट हार्दिकला भेट म्हणून दिलं आहे. वीर पहाडिया एक बिझनेसमॅन आहे.
3 / 5
गिफ्ट स्वीकारल्यानंतर हार्दिकने एक व्हिडिओ शेअर करुन आभार मानले आहेत. "माझ्या भावा वीर पहाडिया धन्यवाद, मला हे गिफ्ट भरपूर आवडलं" लॉकेटमध्ये एका बाजूला गुजरात टायटन्सचा लोगो दिसतोय. दुसऱ्याबाजूला हा संघ आयपीएल 2022 मधला चॅम्पियन असल्याचं लिहिलं आहे.
4 / 5
याआधी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी संपूर्ण टीमची भेट घेतली. यावेळी त्यांनी हार्दिकला स्मृती चिन्ह भेट म्हणून दिलं होतं. आयपीएल चॅम्पियन बनल्यानंतर गुजरात टायटन्सने रोड शो करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले.
5 / 5
हार्दिक या सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांमध्ये आहे. त्याने 44.27 च्या सरासरीने 487 धावा केल्या. 131.26 त्याचा स्ट्राइक रेट होता. त्याने या सीजनमध्ये चार अर्धशतक झळकावली. त्यामुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळालं.