स्वामी विवेकानंद… भारतीय संस्कृतीचा स्वाभिमान, कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी, 1863 रोजी कोलकातामध्ये झाला होता. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात अॅटर्नी (वकील) होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विषयांशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी यादेखील धार्मिक वृत्तीच्या होत्या
1 / 5
12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिनाच्या रुपात साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे महान दृष्टे, अध्यात्मिक आणि सामाजिक व्यक्तिमत्व होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी, 1863 रोजी कोलकातामध्ये झाला होता. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात अॅटर्नी (वकील) होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विषयांशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी यादेखील धार्मिक वृत्तीच्या होत्या.
2 / 5
एक तरुण तपस्वी म्हणून स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे उत्तम जाणकार होते. त्यांनी जगभरात भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचा सर्व धर्मीय अभ्यास होता. सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती.
3 / 5
रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मीय संदेश प्रसारित करण्यासाठी “रामकृष्ण मिशन” स्थापित करण्यात आली. रामकृष्ण मिशनतर्फे त्यांनी धर्मप्रसार केला आणि अध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले.
4 / 5
शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट, शिकागो येथे 11 सप्टेंबर 1893 रोजी सर्व धर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद उपस्थित होते आणि हिंदू वेदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व करीत होते. स्वामीजींनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणाची सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या परिषदेत त्यांनी सनातन वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे आहेत पण जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे, असं विवेकानंद यांनी सांगितलं.
5 / 5
स्वामी विवेकानंद यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर युरोपीय देशांमध्येसुद्धा व्याख्याने दिली. 1895 मध्ये त्यांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला. विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात अध्यात्मिक शिखर गाठले होते. मानसिक आणि आत्मिक दिशेने जीवन गती झाल्याने शारीरिक स्वास्थ्य मात्र त्यांनी गमावले. 4 जुलै 1902 रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली. ते अत्यंत अल्प म्हणजे फक्त 39 वर्षे जगले.