या खास व्यक्तीसोबत ‘तारक मेहता..’च्या ‘बबिता’ची लंच डेट
अभिनेत्री मुनमुन दत्ताला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. मुनमुनचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. एका खास व्यक्तीसोबत ती लंच डेटला गेली होती. त्याचेच फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Munmun Dutta
Image Credit source: Instagram
-
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतीच ती तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत लंच डेटवर गेली होती. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
-
मार्च महिन्यात मुनमुन दत्ताच्या खासगी आयुष्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकतला ती डेट करत असल्याची ही चर्चा होती. इतकंच नव्हे तर या दोघांनी साखरपुडा केल्याचं म्हटलं जात होतं.
-
-
या चर्चांवर मुनमुनने प्रतिक्रिया दिली होती. “हे खूपच हास्यास्पद आहे. या सर्व चर्चांमध्ये कणभरही तथ्य नाही. अशा खोट्या बातम्यांवर स्पष्टीकरण देण्यात मी माझी ऊर्जा घालवणार नाही”, असं तिने म्हटलं होतं. तर राजनेही या चर्चा फेटाळल्या होत्या.
-
-
आता मुनमुन ज्या खास व्यक्तीसोबत लंच डेटवर गेली, ती दुसरी-तिसरी कोणी नसून तिची आई आहे. मुनमुनने तिच्या व्यग्र वेळापत्रकातून आईसाठी वेळ काढून तिला लंच डेटला घेऊन गेली आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
-
मुनमुनने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये मायलेकीचं खास बाँडिंग पहायला मिळतंय. ‘माझ्या आईला सर्वांत चांगली गोष्ट खाऊ घालणं हे माझं सर्वांत मोठं लक्ष्य आहे आणि तिच्यासोबत वेळ घालवणं एक आशीर्वाद आहे’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.