Marathi News Photo gallery Taarak mehta ka ooltah chashmah champaklal aka Amit Bhatt is chain smoker in real life know about him
‘तारक मेहता..’च्या चंपकलाल यांना खऱ्या आयुष्यात ‘ही’ अत्यंत वाईट सवय
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालचे वडील चंपकलाल गडा हे मुलासह सर्वांना चांगली शिकवण देतात दिसतात. मात्र चंपकलालची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांना खऱ्या आयुष्यात एक अत्यंत वाईट सवय असल्याचं समजतंय.
1 / 6
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका असून गेल्या 15 वर्षांपासून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. टीआरपीच्या बाबतीत ही मालिका वर-खाली होत असली तरी अजूनही त्याला प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे चंपकलाल गडा.
2 / 6
मालिकेत जेठालालचे वडील चंपकलाल गडा यांची भूमिका अभिनेता अमित भट्ट साकारतात. या मालिकेत चंपकलाल सर्वांना नेहमी चांगल्या गोष्टींची शिकवण देताना दिसतात. मुलगा जेठालालची ते नेहमीच कानउघडणी करताना दिसतात. मात्र खऱ्या आयुष्यात ते चेन स्मोकर असल्याचं कळतंय.
3 / 6
50 वर्षीय अमित भट्ट यांना 'तारक मेहता..' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी दिलीप जोशी यांच्यासोबत 'एफआयआर'सारख्या लोकप्रिय मालिकेतही काम केलंय. डीएनएच्या वृत्तानुसार, अमित भट्ट यांना एका एपिसोडसाठी 80 हजार रुपये मानधन मिळतं.
4 / 6
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमित भट्ट हे सुरुवातीच्या काळात खूप बिडी प्यायचे. ते चेन स्मोकर होते असं समजतंय. दिलीप जोशी यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री असून दोघं अनेकदा सेटवर मजामस्ती करताना दिसायचे.
5 / 6
अमित भट्ट यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी कृती भट्टशी लग्न केलं. सोशल मीडियावर ते अनेकदा पत्नीसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसतात. अमित आणि कृती यांना दोन मुलं आहेत. देव आणि दीप अशी त्यांची नावं आहेत.
6 / 6
अमित भट्ट यांच्या एका मुलाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम केलं होतं. या एपिसोडमध्ये तो जेठालालचा मुलगा टप्पूच्या मित्राची भूमिका साकारली होती.