विवाहित मित्रांकडून असे कमेंट्स, स्टॉकरने दिला त्रास; ‘तारक मेहता..’ फेम ‘बबिताजी’ची तक्रार

| Updated on: Dec 16, 2024 | 9:57 AM

'तारक मेहता..' या मालिकेत बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वत:विषयी काही खुलासे केले. विवाहित मित्रांकडून येणाऱ्या कमेंट्सचाही तिने खुलासा केला.

1 / 6
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत बबिताजीची भूमिका साकारून अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात पोहोचली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. मुनमुनचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे.

2 / 6
मुनमुनच्या सौंदर्यावर केवळ 'तारक मेहता..'मधील जेठालालच नाही तर असंख्य चाहते फिदा आहेत. सौंदर्यामुळे मुनमुन यांची अनेकांकडून प्रशंसा होते. एका मुलाखतीत मुनमुन यांनी याबद्दलचाच एक किस्सा सांगितला.

3 / 6
मुनमुनने सांगितलं की तिचे मित्र तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक करतात. इतकंच नव्हे तर काहीजण तिच्यावर क्रश असल्याचीही कबुली देतात.

4 / 6
मुनमुन म्हणाली, "कोणत्या महिलेला कौतुक आवडत नाही? अर्थात मलासुद्धा माझी प्रशंसा केलेली आवडते. माझे काही मित्र विवाहित आहेत, तरीसुद्धा ते खुलेपणाने म्हणतात की मला तुझ्यावर क्रश आहे."

5 / 6
"ते माझं हार्मलेस (कोणतीही हानी न पोहोचवणारं) कौतुक करतात. त्यामुळे मीसुद्धा त्यांना ठीक आहे असं म्हणते", असं तिने सांगितलं. मुनमुनने खऱ्या आयुष्यात स्टॉकरचाही सामना केला आहे.

6 / 6
याविषयी ती पुढे म्हणाली, "एका स्टॉकरमुळे मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मी पोलिसांचीही मदत घेतली होती." मुनमुनचं नाव मालिकेत टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनाडकतशीही जोडलं गेलं होतं.