चंद्रपूरच्या ताडोबामधील बफर भागात जनाबाई वाघीण आपल्या बछड्यांना दुध पाजताना पर्यावरण प्रेमींना दिसली आहे. जनाबाई तिच्या पराक्रमांनीही प्रसिद्ध आहे. मात्र, तिच्या मायेची प्रचिती पर्यावरण प्रेमींना नुकतीच आलीय. चिमूर तालुक्यातील मदनापूर बफर क्षेत्रातील प्रसिद्ध वाघीण म्हणून जनाबाईला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच तिने एका ढाण्या वाघाला लक्ष्य केलं होतं. यावेळी तिने आपल्या बछड्यांना या वाघाच्या तावडीतून वाचवलं होतं.