पाकिस्तान, टीम इंडियाचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी. राजकीय तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. मात्र त्यानंतरही या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांची कामगिरीवरुन चर्चा असते. पाकिस्तानला धमाकेदार गोलंदाजांची परंपरा आहे. पाकिस्तानात तोडीसतोड गोलंदाज आहेत. मात्र यांनाही पुरून उरणारे गोलंदाज भारताकडे आहेत. 2021 या वर्षात पाकिस्तानच्या तुलनेत कसोटीमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याच्या बाबतीत भारत वरचढ राहिला आहे.
टीम इंडियाकडून (Axar Patel) अक्षर पटेलने 2021 मध्ये कसोटीत कमी डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
अक्षरने 2021मध्ये आतापर्यंत 6 डावात 4 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर पाकिस्तानकडून (Hasan Ali) हसन अलीने 7 डावात 4 वेळा 5 विकेट्स पटकावल्या आहेत.
या दोघांनंतर एका डावात सर्वाधिक वेळा रवीचंद्रन अश्विनने 5 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 10 डावांमध्ये 3 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रिकेट विश्वात इतर कोणाही गोलंदाजांच्या तुलनेत अक्षर आणि हसनने या 2021 मध्ये सर्वाधिक 4 वेळा 5 विकेट्स घेण्याची किमया केली आहे.