Marathi News Photo gallery Team india cricketer hardik pandya natasa stankovic divorce news morocco famous footballer achraf hakimi saved 90cr when he was seprated from hiba abouk
Hardik Pandya-Natasa Stankovic : हार्दिकची ट्रिक वापरुन ‘या’ प्रसिद्ध खेळाडूने त्याच्या घटस्फोटाच्यावेळी वाचवले 90 कोटी
Hardik Pandya-Natasa Stankovic : सध्या मीडियामध्ये टीम इंडियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांची चर्चा आहे. संपूर्ण आयपीएलमध्ये नताशा हार्दिक सोबत दिसली नाही. त्यानंतर एका मित्रासोबत नताशाचा फोटो व्हायरल झाला. दोघे लवकरच विभक्त होणार अशी आता चर्चा आहे.
1 / 10
सध्या हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. लिव्ह इन रिलेशनशिप त्यानंतर लग्न आणि आता चार वर्षात काडीमोड यामुळे सोशल मीडियावर सध्या दोघांच्याच नात्याची चर्चा आहे.
2 / 10
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्यामध्ये दुरावा का आला? दोघे विभक्त होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर ते दोघ बोलतील तेव्हाच मिळतील. पण सध्या दोघांवरुन वेगवेगळ्या बातम्या सुरु आहेत.
3 / 10
सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यात हार्दिक पांड्याला त्याच्या संपत्तीमधील 70 टक्के वाटा नताशाला द्यावा लागणार असं म्हटल जातय. खरतर घटस्फोटाच्या प्रकरणात अनेक कायदेशीरबाबी असतात. त्यामुळे खरच हार्दिकला इतकी रक्कम द्यावी लागेल का? ते नंतर समजेलच.
4 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती 91 कोटी रुपये आहे. घटस्फोटामुळे त्यातला 70 टक्के वाटा नताशा स्टेनकोविकला द्यावा लागणार असेल, तर 64 कोटीची संपत्ती नताशाच्या नावावर करावी लागेल.
5 / 10
घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात तो म्हणतोय की, मी कुठलीही संपत्ती माझ्या आई-बाबांच्या नावावर घेईन, जेणेकरुन भविष्यात कोणाला 50 टक्के वाटा द्यावा लागू नये.
6 / 10
हार्दिक पांड्याच्या या ट्रिकचा वापर एक प्रसिद्ध फुटबॉलरने याआधी केलाय. फ्रान्सच्या लीग 1 मध्ये खेळणारा मोरक्कोच्या अशरफ हकीमीने घटस्फोटातून 90 कोटी रुपये वाचवले.
7 / 10
अशरफ हकिमीने 2018 साली वयाच्या 19 व्या वर्षी अभिनेत्री हिबा अबूकशी लग्न केलं होतं. पाच वर्षानंतर 2023 मध्ये तिने घटस्फोटाची मागणी केली. हिबा अबूकने अशरफ हकीमीकडे अर्ध्या संपत्तीची मागणी केली.
8 / 10
अशरफ हकिमीने त्यावेळी प्रसिद्ध फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मनसाठी खेळायचा. त्याची सॅलरी 1 मिलियन पाऊंड म्हणजे 9 कोटी रुपये होती. त्यावेळी त्याची एकूण संपत्ती 200 कोटीच्या घरात होती.
9 / 10
अभिनेत्री हिबा अबूकने अशरफ हकिमीकडे त्याची अर्धी संपत्ती मागितली होती. अबूकने 10 मिलियन युरो म्हणजे 90 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी हकीमीने खुलासा केला की, त्याची सर्व संपत्ती आईच्या नावावर आहे.
10 / 10
घरापासून कारपर्यंत इतकच काय कपडे सुद्धा त्याच्या नावावर नाहीत. कोर्टाने म्हटलेलं की, कागदावर अधिकृतरित्या हकिमीच्या नावावर काही नाहीय. त्यामुळे तो हिबा अबूकला एक रुपयाही देणार नाही.