Marathi News Photo gallery Team India cricketer yuzvendra chahal spotted with mystery girl in mumbai amid divorce rumours with dhanashree verma
Yuzvendra chahal : चहल त्या मुलीसोबत दिसला, घटस्फोटाला हीच मुलगी जबाबदार का? PHOTO
Yuzvendra chahal : मागच्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाची चर्चा आहे. या दरम्यान चहल एका मिस्ट्री गर्लसोबत दिसलाय. आता प्रश्न हा निर्माण होतोय की, ही मुलगी चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाला जबाबदार आहे का?
1 / 10
बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या युजवेंद्र चहलच्या व्यक्तीगत आयुष्यात सर्वकाही आलबेल नाहीय. चहलचे पत्नी धनश्री वर्मासोबत संबंध बिघडल्याची चर्चा आहे.
2 / 10
दोघांनी सोशल मीडियावर परस्परांना अनफॉलो केलय. इतकच नाही, चहलने सोशल मीडियावर धनश्रीसोबतचे फोटोही हटवले आहेत. त्यानंतर दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांनी जोर पकडला आहे.
3 / 10
सध्या दोघांपैकी कोणी काही बोललेल नाही. या दरम्यान युजवेंद्र चहल एका मिस्टी गर्लसोबत दिसलाय. तिथे कॅमेरा दिसताच चहलने आपला चेहरा लपवला.
4 / 10
युजवेंद्र चहलच धनश्री वर्मासोबत घटस्फोट होणार असल्याची चर्चा असतानाच तो मिस्ट्री गर्लसोबत दिसलाय. मुंबईच्या जुहू भागात चहल मिस्ट्री गर्लसोबत दिसला.
5 / 10
चहल या मुलीसोबत कारमध्ये होता. मीडिया कॅमेऱ्यांनी त्याला कैद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने चेहरा लपवला. आता युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटासाठी ही मिस्ट्री गर्ल तर जबाबदार नाही, ना अशी चर्चा सुरु झालीय.
6 / 10
वर्ष 2023 मध्ये धनश्री वर्माने इन्स्टाग्रामच्या यूजर नेममधून चहल हे आडनाव हटवलं. तिने एक स्टोरी शेअर करुन नवीन आयुष्य येत असल्याच लिहिलं होतं.
7 / 10
त्याचवळी दोघांच्या रिलेशनशिपबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु झाली. लवकरच हे प्रकरण शांत झालं.
8 / 10
आता दोघांचे मार्ग वेगळे होतायत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दोघांचा घटस्फोट होणार हे निश्चित आहे. फक्त याची औपचारिक घोषणा बाकी आहे.
9 / 10
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माची पहिली भेट लॉकडाऊन दरम्यान झाली होती. धनश्रीने एका रियलिटी शो मध्ये सांगितलेलं की, चहलने डान्स शिकण्यासाठी तिच्या कॉन्टॅक्ट केलेला.
10 / 10
त्यानंतर दोघांमध्ये मैत्री पुढे मैत्रीच प्रेमात रुपांतर झालं. दोघांनी लवकरच आपल्या नात्याला नाव दिलं. चहल आणि धनश्रीने डिसेंबर 2020 मध्ये धमूधडाक्यात लग्न केलं होतं.