Haseen Jahan : ‘सौरव गांगुलीसाठी बायका म्हणजे…’, मोहम्मद शमीच्या पूर्वपत्नीचा गंभीर आरोप

| Updated on: Aug 22, 2024 | 12:54 PM

Haseen Jahan : टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमीची पूर्वपत्नी हसीन जहांने सौरव गांगुलीवर गंभीर आरोप केले आहेत. हसीना जहां तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. तिने मोहम्मद शमीवर सुद्धा अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. आता तिने सौरव गांगुलीवर निशाणा साधला आहे.

1 / 9
कोलकाताच्या आरजी कर मेडीकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. येथे एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

2 / 9
या घटनेने वैद्यकीय विश्वाला हादरवून सोडलं. डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. कोलकाता येथे घडलेल्या या घटनेचे दिल्लीपासून मुंबईपर्यंत पडसाद उमटले. डॉक्टरांनी मोर्चे काढले, आंदोलन केली.

3 / 9
याच विषयावर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली असं काही बोलून गेला की, त्यावरुन मोठा गदारोळ झाला. वाद झाल्यानंतर सौरव गांगुलीने त्यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलं.

4 / 9
सौरव गांगुलीने नंतर सायलेंट प्रोटेस्ट केलं. सोशल मीडिया अकाऊंटवरील डिस्प्ले फोटो काळा केला.

5 / 9
इतकच नाही, गांगुली कोलकाता येथे सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चालला आहे.

6 / 9
काही दिवसांपूर्वी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर गांगुली म्हणालेला की, "जे काही झालं, ते चुकीच आहे. पण संपूर्ण जगात अशा घटना घडत असतात. त्यासाठी संपूर्ण बंगालच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं चुकीच आहे"

7 / 9
टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमीची एक्स वाइफ हसीन जहांने गांगुलीच हेच स्टेटमेंट शेयर करुन काही जिव्हारी लागणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत.

8 / 9
"सौरव गांगुली सारख्या लोकांसाठी महिला कदाचित एंटरटेनमेंट आणि मस्ती करण्याची गोष्ट असाव्यात. म्हणूनच त्याने म्हटलं बलात्कारासारख्या घटना संपूर्ण देशात होतात"

9 / 9
"सौरव गांगुली तुमची मुलगी सुरक्षित आहे. म्हणून तुम्हाला दुसऱ्यांच्या सुरक्षेची जाणीव नाहीय" असं हसीना जहाँने सौरव गांगुलीच्या जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलय.