टीम इंडिया साऊथहॅम्प्टनला पोहोचली, बुमराहचा पीचसोबत सेल्फी, रोहितच्या कॅमेरात फायनलचं मैदान!
टीम इंडियाचे सगळे खेळाडू साऊथहॅम्प्टनला पोहोचले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना याच साऊथहॅम्प्टन ग्राऊंडवर उभय संघांमध्ये रंगणार आहे. (team india reached southampton bumrah rohit photo virat wtc final)
रोहित शर्माने रिषभ पंतसोबत शेअर केलेल्या फोटोत दोघेही 18 जूनपासून WTC फायनल होणार असलेल्या स्टेडियमजवळ आहेत. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे, तेदेखील या स्टेडियमला लागूनच आहे किंवा तेच त्याचा एक भाग आहे, असं म्हणता येईल.
Follow us on
टीम इंडियाचे सगळे खेळाडू साऊथहॅम्प्टनला पोहोचले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना याच साऊथहॅम्प्टन ग्राऊंडवर उभयतांमध्ये रंगणार आहे. या दौर्यासाठीर भारतीय संघ प्रथम लंडनला पोहोचला आणि तेथून बसने साऊथॅम्प्टनला रवाना झाला.
इंग्लंडमधील पहिला फोटो केएल राहुलने पोस्ट केला. लंडनमध्ये उतरताच त्याने आपल्या फॅन्सला प्रवास सुखकर झाला, या अर्थाने पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
जसप्रीत बुमराहनेही साऊथहॅम्प्टनला पोहोचल्यानंतर स्वत:चा एक फोटो शेअर केला या फोटोत WTC फायनल खेळण्याची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते आहे. त्याने फानयल मॅचच्या पीचसोबत सेल्फी घेतला.
रोहित शर्माने रिषभ पंतसोबत शेअर केलेल्या फोटोत दोघेही 18 जूनपासून WTC फायनल होणार असलेल्या स्टेडियमजवळ आहेत. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे, तेदेखील या स्टेडियमला लागूनच आहे किंवा तेच त्याचा एक भाग आहे, असं म्हणता येईल.
सोशल मीडियावर अशाच प्रकारचे फोटो ऋद्धिमान साहा आणि इतर खेळाडूंनी देखील पोस्ट केले आहेत. साऊथहॅम्प्टनला पोहोचल्यानंतर टीम इंडिया खूपच उत्साहात आहे. काही दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर टीम इंडिया WTC फायनलची तयारी सुरू करेल.