गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे प्रचंड चर्चेत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 मध्ये झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे अनेक पार्ट्यांमध्येसोबतच जातात. इकतेच नाही तर हे दोघेही एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना नेहमीच दिसतात.
गेल्या काही दिवसांपासून सतत तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्रा याच्यासोबतच्या लग्नाबद्दल बोलताना दिसली आहे. तेजस्वी प्रकाश म्हणाली की, करण लग्नासाठी तयार आहे.
मी फक्त होकार देणे बाकी आहे. मी होकार दिला की, आमचे लग्न होईल. ज्यावेळी मी लग्नाला होकार देणार त्यादिवशी याबद्दल मी चाहत्यांना देखील सांगणार आहे.