मंदिरास ५० वर्षांपूर्वी जलसमाधी मिळाली, आता दिसू लागले, कारण… मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

| Updated on: May 18, 2024 | 1:01 PM

उजनी धरणाचे पाणी झपाटयाने कमी झाल्यामुळे हजारो वर्षांपूर्वीचे पळसनाथाचे हेमाडपंथी मंदिर उघडे झाले आहे. ५० वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेले मंदिर दिसू लागल्यामुळे पळसदेवकरांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहे. अदभूत, नयनरम्य अशी उजनी जलाशयातील पुरातन पळसनाथ मंदिराचे विशेष फोटो...

1 / 6
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे १५ किलो मीटरवर भीमानदीच्या पात्रात उजीन धरण बांधले गेले. १९७५ साली बांधल्या गेलेल्या या धरणामुळे अति प्राचीन हेमाड पंथी पळसनाथांच्या मंदिरास जलसमाधी मिळाली होती.

2 / 6
आता तब्बल ५० वर्षांनी उजनी धरणातील पाण्याची पातळी खालवली आहे. यामुळे ५० वर्षे पाण्यात लाटांशी झुंज देणारे हे मंदिर उघडे झाले आहे. सध्या काही प्रमाणात त्याची पडझड झालीय. हे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत.

3 / 6
पळसनाथांच्या मंदिर किती जुने आहे, त्याची माहिती नसली तरी ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात "पलाशतीर्थ" म्हणून आढळून येते. या हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात केले आहे. शिखर साप्तभूमी पद्धतीची बांधले आहे.

4 / 6
मंदिराच्या शिखरासाठी पक्क्या विटा चुना वापरण्यात आला आहे. मंदिरासमोर भव्य सभा मंडप, गाभारा, उंच शिखर, लांब लांब शिळा, विविध  मदनिका, अलासकन्या, सूरसुंदरी, जलामोहिनी, नागकन्या अशा मुर्त्या मंदिरात आहे.

5 / 6
मंदिरातील चौकोनी खांब, वर्तुलाकुर्ती पात्रे, पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंच शाखा सुस्थितीत दिसून येतात. या शिल्पा मुर्त्यांमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर पार्वती तसेच रामायण, महाभारत आणि इंद्र दरबारी असणाऱ्या देवी देवतांच्या शिल्प आहेत.

6 / 6
मंदिरात अफलातून अप्रतिम कोरीव काम केले आहे. मंदिराची जडण घडण वाख्यान्या जोगी आहे. उजनी जलाशयातील पाण्याची पातळी मायनसमध्ये आली आहे. यामुळे उजनी धरणाच्या पोटात असणारे ऐतिहासीक शिल्पे दिसू लागले आहेत.