पुणे, नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, वाहनांच्या मोठ्या रांगा

| Updated on: Jul 27, 2023 | 10:26 AM

पुणे, मुंबई आणि पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक गुरुवारी ठप्प झाली. दोन्ही ठिकाणी वाहतूक ठप्प होण्याची कारणे वेगवेगळी होती. परंतु घराबाहेर पडणाऱ्यांची यामुळे चांगलीच अडचण झाली आहे.

1 / 5
पुणे, नाशिक महामार्गावर चांडोलीजवळ तीन मालवाहू वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

2 / 5
अपघातात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले आहे. नागरिकांनी या दोन्ही वाहन चालकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

3 / 5
पुणे शहराकडून नाशिक शहराकडे जाताना चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

4 / 5
पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम सुरु केले आहे. तसेच दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत सुरु करण्याचे काम सुरु केले आहे.

5 / 5
पुणे-मुंबई महामार्गावर दुपारी १२ ते २ आज मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. मुंबईवरुन गुजरातला जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे आज घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच अडचण होणार आहे.