यापूर्वी दोन-तीन वेळा गायधने हे उमरेड करांडला अभयारण्यात जंगल सफारीला गेले होते. पण, त्यांना कधी वाघ दिसले नव्हते. यावेळी मात्र अख्ख वाघाचं कुटुंबच त्यांना दिसले. त्यामुळं त्यांचे पैसे वसूल झालेत.
महेश गायधने हे आपल्या मित्रांसोबत उमरेड करांडला अभयारण्यात जंगल सफारीला गेले होते. सुर्या वाघाचं अख्ख कुटुंबच पर्यटकांना दिसलं.
उमरेड-करांडला अभयारण्यात वाघ सहजासहजी दिसत नाही. मात्र एकाच वेळी वाघाचं संपूर्ण परिवार दिसले. पर्यटकांची पावले पुन्हा उमरेड करांडला अभयारण्याकडे वाळू लागली आहेत.
तुमसर येथील महेश गायधने हे आपल्या मित्रांसोबत उमरेड-करांडला अभयारण्यात काल सकाळी जंगल सफारीला गेले होते. त्यांना सूर्य वाघ, फेरी वाघीण व त्यांचे 5 छावे पाहायला मिळाले.
भंडारा : जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील उमरेड-करांडला अभयारण्यात पर्यटकांना एकाच वेळी 7 वाघांचे दर्शन झाले. त्यामुळं पर्यटक जाम खूश झाले आहेत.