PHOTO | आयपीएलच्या 14 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करणारे खेळाडू
कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलो.
1 / 8
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आयपीएलचा 14 वा मोसम 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. या 29 सामन्यात वेगवेगळ्या टीममधील शानदार अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत. गत मोसमात उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिट्ल्सने या मोसमात शानदार कामगिरी केली. दिल्लीच्या शिखर धवनने 8 सामन्यात 134 च्या स्ट्राईक रेट आणि 54 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 380 धावा केल्या. यासह 29 सामन्यानंतर शिखर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. तसेच वेगवान गोलंदाज आवेश खानने 8 सामन्यात 7.7 च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट्स घेतल्या. आवेश या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.
2 / 8
चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील यशस्वी टीमपैकी एक. या वेळेस फॅफ डु प्लेसीसची बॅट चांगलीच तळपली. त्याने 7 डावात 64 च्या सरासरी आणि 145 च्या शानदार स्ट्राईक रेटने 320 धावा केल्या. तसेच सॅम करणने 7 डावात 9 विकेट्स घेतल्या.
3 / 8
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडूने ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेल या दोघांनी धमाका केला. पंजाबकडून बंगळुरुत आलेल्या मॅक्सवेलने 7 सामन्यात 37 ची सरासरी आणि 144.8 स्ट्राईक रेटसह 223 धावा केल्या. तर हर्षलने 7 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या. हर्षल या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
4 / 8
5 वेळा विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्स. कर्णधार रोहित शर्माने 7 मॅचमध्ये 35.7 ची सरासरी आणि 128 च्या स्ट्राईक रेटने 250 धावा चोपल्या. तर फिरकीपटू राहुल चहरने 7 मॅचमध्ये 11 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
5 / 8
राजस्थान रॉयल्सचा नवनिर्वाचित कर्णधार संजू सॅमसनने 46 च्या सरासरीने आणि 145.78 स्ट्राइक रेटसह 277 धावा केल्या. यामध्ये 1 शतकाचा समावेश आहे. तसेच सर्वात महागडा ठरलेल्या ख्रिस मॉरीसने 14 विकेट्स घेतल्या.
6 / 8
पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल या मोसमात स्थगितीपर्यंत दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 7 सामन्यात 66 च्या सरासरी आणि 136 च्या स्ट्राईक रेटने 4 अर्धशतकांसह 331 धावांचा रतीब घातला. तसेच वेगवान बोलर मोहम्मद शमीने पंजाबकडून सर्वाधिक 8 विकेट्स पटकावल्या.
7 / 8
कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना या मोसमात छाप सोडता आली नाही. केकेआरकडून नितीश राणाने 201 धावा केल्या. तर पॅट कमिन्सने 7 सामन्यात 9 फलंदाजांची दांडी गुल केली.
8 / 8
सनरायजर्स हैदराबादसाठी हा मोसम निराशाजनक राहिला. मात्र त्यानंतरही जॉनी बेयरस्टोने चांगली फलंदाजी केली. त्याने 7 डावात 2 अर्धशतकांसह 248 धावा केल्या. तर फिरकीपटू राशिद खानने 10 विकेट्स घेतल्या.