ईशान खट्टर याचे एका मागून एक असे दोन चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. ईशान खट्टर याने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये.
ईशान खट्टर याने धडक आणि बियॉन्ड द क्लाउड्स चित्रपटाच्या माध्यमातून एक चांगली सुरूवात बाॅलिवूडमध्ये नक्कीच केलीये. मात्र, त्यानंतर त्याचे चित्रपट धमाका करत नाहीयेत.
खाली पीली आणि फोन भूत हे दोन्ही चित्रपट ईशान खट्टर याचे फ्लाॅप गेले. या चित्रपटाला काहीच धमाका करता आला नाही. आता यावर एका मुलाखतीमध्ये ईशान खट्टर हा बोलताना दिसला.
ईशान खट्टर म्हणाला की, अपयशानंतर यशापर्यंत पोहचणे खूप महत्वाचे असते. मी सतत त्यासाठी खूप जास्त मेहनत घेत आहे. मी माझ्यामध्ये सुधारणा देखील करतोय.
ईशान खट्टर याच्या बोलण्यातून हे स्पष्ट झाले आहे की, अपयशानंतर अजिबातच ईशान खट्टर हा खचला नाहीये. आता आगामी पिप्पा चित्रपटात तो दिसणार आहे.