या शहरातील घड्याळ्यात कधीच वाजत नाही 12, फक्त असतात 1 ते 11 आकडे
आजपर्यंत तुम्ही जिथे ही गेले असाल तिथे जर तुम्हाला चौकात किंवा सार्वजनिक ठिकाणी घड्याळ पाहिले असेल तर तुम्हाला सगळीकडे १ ते १२ आकडेच दिसले असतील. पण जगात एक शहर असं आहे जिथे घड्याळ्यात फक्त १ ते ११ आकडे आहेत. या शहरातील घड्याळ्यांमध्ये १२ कधीच वाजत नाही.
1 / 5
आपण सर्वजण वेळ पाहण्यासाठी जे घड्याळ वापरतो त्या घडाळ्यात 1 ते 12 पर्यंत संख्या असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगात एक असं शहर आहे जिथे घड्याळात 12 वा अंकच नसतो? येथे कधीही 12 वाजत नाहीत. त्या शहराचे नाव तुम्हाला माहीत आहे का?
2 / 5
जगातील अनेक अशी शहरे आहेत ज्या शहरात चौकाचौकात तुम्हाला घड्याळ दिसतील. भारतात देखील ते आढळतील. टॉवर किंवा चर्चवर देखील मोठमोठी घड्याळे बसवली जातात. पण असे एक शहर आहे ज्याचे घड्याळ कधीच 12 वाजवत नाही? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे.
3 / 5
सोलोथर्न शहरातील घड्याळ्यांमध्ये कधीच 12 वाजत नाहीत. हे शहर स्वित्झर्लंड या देशात आहे. सोलोथर्नचे लोक 11 या क्रमांकाला खूप शुभ मानतात आणि ही संख्या त्यांनी इतकी आवडीची आहे की, त्यांनी त्यांच्या घड्याळात 12 क्रमांकाचा समावेश केला नाही.
4 / 5
सोलोथर्नमधील घड्याळांमध्ये फक्त 1 ते 11 पर्यंतचीच संख्या दिसते. येथे चर्च किंवा चौकाचौकात लागलेल्या घड्याळांमध्येही कधी 12 वाजत नाहीत. येथे 11 क्रमांकाचे महत्त्व यावरुन दिसून येते. सेंट उर्सस येथील मुख्य चर्चला 11 दरवाजे आणि 11 खिडक्या आहेत आणि ते बांधण्यासाठी देखील 11 वर्षे लागली आहेत.
5 / 5
या शहरातील लोकांसाठी 11 क्रमांक भाग्यवान आहे. ते 11 तारखेला त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि भेटवस्तू देखील 11 शी संबंधित असेल अशीच देतात. शतकानुशतके ही गोष्ट सुरु आहे.