शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट कमाईमध्ये धमाका करताना दिसतोय. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळतंय. चित्रपटाने ओपनिंग डेला धमाका केला.
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने रिलीजच्या 16 व्या दिवशी मोठा धमाका केलाय. आता चित्रपटाला रिलीज होऊन 16 दिवस झाले. अजूनही चित्रपट धमाका करतोय.
जवान चित्रपटाने रिलीजच्या 16 व्या दिवशी तब्बल 7 कोटींची कमाई केलीये. आता चित्रपटाने एकून 533.78 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केलंय.
पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाचा जलवा बघायला मिळू शकतो. इतकेच नाही तर विकेंडला चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.
शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसला. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहिला.