जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवत हून वरवंडच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी येथील अंबिका सास्कृतिक कला केंद्राच्या नर्तीकानी आपल्या अदाकारीत भजन, भक्तीगींतांसह मराठी गाण्यावर नृत्य सादर करतात.
या कला केंद्रातील कलाकारांकडे समाज्याचा पाहण्याचा दृष्टीकोन जरी वेगळा असला तरी या कलाकारांचा समाजाकडे पाहण्याच्या दृष्टीकोन मात्र आपुलाकीचाच आसतो हेच या कलाविष्काराकडे व त्यांच्या आजच्या निस्सीम सेवेवरुन समाजातील दिसून येतेय.
पायी चालत वारीत वारकऱ्यांनच्या सेवेसाठी कोणी अन्नदान करतंय तर कोणी अंथरूण देतेय तर कोणी पांघरून देतय. मात्र पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या कला केंद्रातील नर्तिकानी आपल्या कलेचे सादरीकरण वारकऱ्यांसमोर करून आपलीही सेवा विठल चरणी पोहचविण्याचा सायास केलाय.
या वेळी या नर्तीकानी एखादा विठुरायाच्या भक्ती गीतावर टाळ धरला तर लावणीही सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला या जुगलबंदी मूळ जणू या वारकऱ्यांचा थकवाच दूर झाला.
गेल्या 31वर्षांपासून या कलाकेंद्राच्या नर्तिका वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात ही परंपरा त्यांनी आजही कायम जपलीय. आज जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे दहा हजार वारकऱ्यांना सुग्रास असे भोजन ही देण्यात आलेय याच बरोबर कलाही सादर करुन त्यांची सेवा केलीय.