एखाद्या क्षेत्रात उतरायचं आणि आपलं नाव त्या क्षेत्रात तयार करायचं म्हणटलं की घाम गाळावा लागतो, तो कोणलाचं चुकलेला नाही त्यामुळे जेवढे मोठे झाले आहेत, त्यांनी सगळ्यांनी घाम गाळला आहे. मृणाल ठाकूर टीव्ही कलाकार म्हणून अत्यंत प्रसिध्द आहे. तसेच तिने तिची बॉलिवूडमध्ये सुध्दा ओळख निर्माण केली आहे.
तरूण वयात आत्महत्या करण्याचा विचार कसा डोक्यात यायचा असं मृणाल ठाकूर यांनी सांगितलं आहे. तसेच मृणालने बीएमएम कोर्स करण्यासाठी तिच्या आई-वडिलांना अत्यंत कठिण परिस्थित समजावलं होतं. ज्यावेळी तिला हा कोर्स केल्यानंतर तीला समाधान मिळालं नाही म्हणून ती अत्यंत निराश झाली होती.
मृणालची मानसिक स्थिती बिघडायला कारण ही तशीच होती कारण तिला घरच्यांनी एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं. तिच्या आई वडिलांना तिला डॉक्टर करायचं होतं. पण मृणालला मात्र क्राईम पत्रकार व्हायचं होतं. ती असं काही करणार होती की तिला टिव्हीवरती दिसायचं होतं.
अनेकवेळा मला असं वाटायचं की माझं वयाच्या 23 वर्षी लग्न करून देतील. तसेच मला मुल होतील. पण मला वेगळं काहीतरी करायचं असल्याने मी ऑडिशन द्यायला सुरूवात केली आणि मला अनेकदा नाकारण्यात आलं.
तिची 15 ते 20 वर्ष आयुष्यात संघर्ष करण्यात गेली आहेत. त्यावेळी अनेक गोष्टी मला नकारात्मक वाटत होत्या. तसेच त्यावेळच्या संघर्षाने मला आत्महत्या करायचा विचार डोक्यात यायचा.
मी ज्यावेळी लोकलने प्रवास करीत होती, त्यावेळी माझ्या डोक्यात सतत विचार यायचा की उडी मारून मरून जाऊ, पण ते केलं नाही.
त्यावेळी मृणाल मुंबई एकटी राहत होती, तसेच त्यावेळी मला माझ्या खाण्यावर लक्ष ठेवावं लागत होतं. समजा मी 500 रूपये जरी काढले तरी माझ्या बाबांना तात्काळ समजायचे. तसेच त्या 500 रूपयांचा मला हिशोब द्यावा लागत होता.
मृणाल ठाकूरच्या कारकिर्दीबद्दल बोलताना म्हणाली की, ये खामोशियां आणि कुमकुम भाग्य या मालिकांमध्ये काम केल्यानंतर माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली.