भारतातील असं राज्य जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही, ना आतापर्यंत एकही ट्रेन धावली; इथले नागरिक प्रवास कसे करतात?
भारतातील असं राज्य जिथे आजपर्यंत एकही रेल्वे आली नाहीये, तर, या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाहीये. त्यामुले इथले नागरिक नक्की प्रवास कसे करत असतील असा प्रश्न आहे.
1 / 12
भारतातील असं राज्य जिथे ना रेल्वे स्टेशन,ना राज्यातून एकही रेल्वे धावली आहे.
2 / 12
भारतातील असं राज्य जिथे आजपर्यंत एकही रेल्वे आली नाहीये, तर, या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाहीये. त्यामुले इथले नागरिक नक्की प्रवास कसे करत असतील असा प्रश्न आहे.
3 / 12
भारतीय रेल्वे म्हणजे प्रत्येक देशाला, शहराला जोडणारं मोठं जाळं आहे. दररोज प्रवासी मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करतात. शहर, गावं, राज्य फिरतात. एवढच नाही तर प्रत्येक नागरिकाला रेल्वे प्रवास म्हणजे हा सुख-सुविधांचा वाटतो. कारण भारतीय रेल्वेने तेवढी सुविधा तर नक्कीच प्रवाशांसाठी करून ठेवली आहे.
4 / 12
मात्र आपल्या भारतात असंही एक राज्य आहे की जिथे आजपर्यंत एकही रेल्वे धावली नाही, नाही या राज्यात एकही रेल्वे स्टेशन. या शहराचं नाव आहे सिक्कीम.
5 / 12
भारतात 1853 मध्ये पहिल्यांदा रेल्वे धावली, तेव्हापासून रेल्वेचं जाळं हळूहळू सर्वत्र पसरत गेलं. पण सिक्कीम असं एक राज्य आहे जिथे अद्यापही रेल्वे पोहोचली नाही.
6 / 12
भारतात 1853 मध्ये पहिल्यांदा रेल्वे धावली, तेव्हापासून रेल्वेचं जाळं हळूहळू सर्वत्र पसरत गेलं. पण सिक्कीम असं एक राज्य आहे जिथे अद्यापही रेल्वे पोहोचली नाही.
7 / 12
सिक्कीममधील रेल्वे ट्रॅकच्या बांधकामात अडथळा आणणारे मुख्य कारण म्हणजे तेथील भौगोलिक स्थिती आणि खडबडीत भूभाग. सिक्कीम हे डोंगराळ राज्य आहे. त्यामुळे येथे तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अप्रत्याशित हवामान आहे. अशा स्थितीत येथील जमीन रेल्वेच्या जाळ्यासाठी म्हणावी तशी मजबूत मानली जात नाही.
8 / 12
सिक्कीम हे एक असे राज्य आहे जे हिरव्यागार जंगलांनी वेढलेले आहे. सिक्कीममध्ये रेल्वेचे जाळे उभारले तर ते पर्यावरणासाठी चांगले राहणार नाही, भविष्यात भयावह परिस्थिती पाहावी लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
9 / 12
सिक्कीममध्ये रेल्वेचे जाळे नसले तरी येथे बांधलेले रस्ते खूपच सुंदर आहेत. शक्यतो इथले लोकं रस्त्यांच्या माध्यमातूनच प्रवास करतात. कारण राज्यात रस्त्यांचे जाळे सुस्थितीत आहे आणि शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये बागडोगरा विमानतळ आहे.
10 / 12
जर तुम्हाला ट्रेनने सिक्कीमला जायचं असेल तर तुम्हाला बंगालमधील सिलीगुडी किंवा जलपाईगुडी रेल्वे स्टेशनवर उतरावं लागतं. तिथून बस किंवा टॅक्सीने सिक्कीमला सहज पोहोचता येत.
11 / 12
दरम्यान, सिक्कीमला पुढील काही वर्षांत पहिले रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. ज्याचे नाव ‘रंगपो रेल्वे स्टेशन’ असं असणार असल्याचे बोलले जाते.
12 / 12
हे रेल्वे स्टेशन रंगपो शहर आणि सिक्कीममधील पाक्योंग जिल्हा, गंगटोक जिल्हा आणि मंगन जिल्हा या तीन जिल्ह्यांना सेवा देईल. ज्यामध्ये तीन प्लॅटफॉर्म आणि 4 रेल्वे ट्रॅक असणार आहेत.