भारतातील 4 जादुई ठिकाणे, जिथे आंघोळ केल्याने बरे होतात आजार!
भारतात अशा 4 जागा आहेत जिथे आंघोळ केल्याने आजार बरे होतात. कोणती आहेत 4 जादुई ठिकाणं जिथे माणसाचे आजार बरे होतात? लोकांची अशी मान्यता आहे, लोकांची श्रद्धा आहे ही की इथे डुबकी मारल्याने आरोग्य सुधारते. जाणून घेऊयात कोणती अशी 4 ठिकाणे आहेत.
1 / 5
तुम्ही कधी अशा ठिकाणांची नावं ऐकली आहेत जिथे अंघोळ केल्याने आजार बरे होतात? अगदी कॅन्सर सारखा आजार सुद्धा बरा होऊ शकतो असं होऊ शकतं का? चला तर जाणून घेऊया अशी 4 ठिकाणे!
2 / 5
पुष्कर सरोवर: पुष्कर सरोवरचं नाव सगळेच ऐकून आहेत. हे ठिकाण राजस्थानमध्ये आहे. इथे एकमेव ब्रम्हमंदिर आहे. रामायणात सुद्धा पुष्करचा उल्लेख आढळतो. पुष्कर सरोवर मध्ये डुबकी मारली की शारीरिक व्याधी दूर होतात अशी बऱ्याच लोकांची अशी श्रद्धा आहे. राजस्थानमध्ये असणारं हे पुष्कर सरोवर जगप्रसिद्ध आहे. इथे अंघोळ केल्यावर कॅन्सर सुद्धा बरा होतो अशी लोकांची श्रद्धा आहे.
3 / 5
मणिमहेश: या ठिकाणाबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? इथे एक खूप सुंदर तलाव आहे जिथे डुबकी मारली की आरोग्य नीट होतं. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की इथल्या पाण्यात डुबकी मारल्याने स्नायू मजबूत होतात शिवाय शारीरिक जखमाही भरून निघतात. मणिमहेश कैलास पर्वतावर स्थित आहे. हे ठिकाण हिमाचल प्रदेशात आहे.
4 / 5
भीमकुंड: मध्य प्रदेशातील छतरपूर मध्ये भीमकुंड आहे. हे भीमकुंड महाभारत काळातील आहे असं मानलं जातं. विशेष म्हणजे हे भीमकुंड नेमकं किती खोल याची कुणालाच कल्पना नाही. छतरपूरमधील स्थानिकांचा विश्वास आहे की भीमकुंडात डुबकी मारल्यास आरोग्य सुधारू शकतात.
5 / 5
गंगनानी: गंगनानी हे छोटंसं गाव उत्तराखंडमध्ये आहे. हे गाव गंगोत्री मार्गावर आहे. इथे येणाऱ्या बहुतांश लोकांचं असं मत आहे की इथे असणाऱ्या गरम पाण्याच्या पात्रात डुबकी मारल्यावर आरोग्य सुधारते. या गरम पाण्यात एक डुबकी मारली की शारीरिक विकार दूर होतात असं मानलं जातं.