असे 5 लोकप्रिय स्नॅक्स, आरोग्यासाठी आहेत घातक, टाळा!

| Updated on: Aug 30, 2023 | 7:28 PM

दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत कारण ते खूप चविष्ट असतात. आपण हे खूप आवडीने खातो, बनवतो, ऑर्डर करतो पण यातले काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. हे पदार्थ माहित करून घ्या आणि खाणे टाळा!

1 / 5
सामोसा! हा कदाचित भारतात सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारा पदार्थ असावा. पाहुणे आले, पावसाळा असला, मित्र मैत्रिणी आले, गेट टूगेदर असलं की सगळ्यात सोपं आणि पटकन पळत जाऊन आणण्यासारखा हा स्नॅक्स. पण सामोसा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक! सामोसा मध्ये कॅलरी आणि फॅट्स प्रचंड असतात. हे खाणं टाळा.

2 / 5
चिप्सचे असंख्य प्रकार आहेत. बनाना चिप्स, बटाटा चिप्स वगैरे वगैरे. बघा चिप्स कितीही कुणीही सांगितलं की ते हेल्दी आहेत तरीही ते कधीच हेल्दी नसतात. तळलेले पदार्थ आरोग्यासाठी कसे चांगले असू शकतात? यात कॅलरी आणि फॅट्स खूप असतात. हेही खाणे टाळा.

3 / 5
बेसन आणि मसालेदार बटाटे, भरपूर तिखट आणि डीप फ्राईड आम्ही तुमच्या आवडत्या बटाटावडा बद्दल बोलतोय. बटाटा वडा चवीला जरी चांगला असला तरी तो आरोग्यासाठी चांगला नसतो. तळले जात असल्यामुळे यात कॅलरी आणि फॅट्स खूप असतात.

4 / 5
चटकदार चिंचेचे पाणी, चणे, कुरकुरीत पुरी आणि चणे म्हणजेच सगळ्यांची लाडकी पाणीपुरी! चिंचेच्या पाण्यात साखर असते. पुरी तळलेली असते. पाणीपुरी बरेचदा गाड्यावर, उघड्यावर विकली जाते. आरोग्यासाठी हानिकारक!

5 / 5
मेदू वडा आणि साबुदाणा वडा तळल्यामुळे खरं तर हानिकारक असतात. जर हे पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवले तर इतके हानिकारक नसतात पण तळले तर खूप हानिकारक.