भारतातील 5 लोकप्रिय कम्फर्ट फूड्स!
असे काही पदार्थ असतात जे भारतातील लोकं न चुकता खातात. हे पदार्थ आरोग्यदायी असतात आणि या पदार्थांचं सेवन नाश्त्यामध्ये आवर्जून केलं जातं. तुम्हाला माहित आहेत का असे कोणते पदार्थ आहेत? नाश्ता चांगला आणि आरोग्यदायी असावा त्यामुळे हे पदार्थ लक्षात ठेवा आणि त्यांचा आपल्या आहारात न चुकता समावेश करा.
1 / 5
ढोकळा: तांदूळ आणि हरभऱ्याच्या पिठापासून बनवलेला ढोकळा बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ असतो. ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाल्ला जातो. खमण ढोकळा हा खूप चविष्ट आणि स्पंजी असतो. भारतातील लोकप्रिय पदार्थांमध्ये या ढोकळ्याचा समावेश होतो. ढोकळा जर वाफवलेला असेल तर तो आरोग्यासाठी खूप चांगला असतो.
2 / 5
पनीर टिक्का: पनीर कुणाला आवडत नाही? पनीर टिक्का हा खूप चविष्ट, मसालेदार पदार्थ आहे. पनीर टिक्का मॅरिनेट केले जाते. आपण बरेचदा पनीर, चिकन मॅरिनेट करून ते भाजून खातो. चिकन तर चविष्ट लागतंच पण जर दह्यामध्ये मसाले टाकून पनीरचे तुकडे मॅरिनेट केले आणि ते भाजून खाल्ले की त्याचा बनतो पनीर टिक्का! हा पनीर टिक्का खूप लोकांना आवडतो.
3 / 5
इडली चटणी: इडली हा पदार्थ पौष्टिक असतो. नाश्त्यामध्ये इडली खावी असं नेहमी सांगितलं जातं. गरम गरम वाफवलेली इडली आणि हिरवी चटणी आणि सांबार सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या नाश्त्यामध्ये खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.
4 / 5
मिसळ पाव: लिंबू, कांदा, कोथिंबीर, शेव हे वरून टाकून गरम गरम खाल्ली जाणारी मिसळ. ही मसालेदार, तिखट, चटकदार मिसळ चविष्ट असते. यात सगळ्या गोष्टींचं मिश्रण असल्याने ते आरोग्यासाठी खूप चांगले असते. मिसळ पाव हा नाश्त्यासाठी सगळ्यात आवडता पदार्थ आहे.
5 / 5
चिकन किंवा मटण बिर्याणी हा लोकप्रिय पदार्थ आहे. बिर्याणी कुठे किती चांगली मिळते याची माहिती सगळेजण ठेवतात. कुठल्याही हॉटेलमध्ये जा हा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने सर्व्ह केला जातो. आता तर व्हेज बिर्याणी हा सुद्धा असाच एक प्रकार सगळीकडे मिळतो. व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी हा पदार्थ सगळ्यांच्या चॉईस मध्ये येतो. बिर्याणी आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते.