बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 2016 मध्ये संजय कपूर यांच्यासोबत घटस्फोट घेतला. तेंव्हापासून करिश्मा कपूर ही एकटे आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीने दुसरे लग्न केले नाहीये.
अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने नागा चैतन्य याच्यासोबत 2021 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर सामंथा रूथ प्रभू हिने दुसरे लग्न केले नाहीये. नागा चैतन्यचे एका अभिनेत्रीसोबत नाव जोडले जातंय.
महिमा चाैधरी हिने बाॅबी मुखर्जी याच्यासोबत घटस्फोट घेतला. आता यांच्या घटस्फोटाला काही वर्षे होत आहेत. मात्र, असे असतानाही महिमा चाैधरीने दुसरे लग्न केले नाही.
चित्रांगदा सिंहने 2014 मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, अभिनेत्रीने अजूनही दुसरे लग्न केले नाहीये. चित्रांगदा सिंह ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.
मनीषा कोइराला हिने 2012 मध्ये सम्राट दहल याच्यासोबत घटस्फोट घेतला. तेंव्हापासून अभिनेत्रीच्या आयुष्यात दुसरे कोणीच आले नाही. अभिनेत्री अजूनही लग्न केले नाहीये.