उन्हाळ्यात त्वचेला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात चेहऱ्यावर टॅनिंगची समस्या निर्माण होते. विशेष करून पुरुषांनी उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे.
उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन हे नेहमी वापरले पाहिजे. सनस्क्रीन लावण्याने आपली त्वचा हेल्दी राहते.
व्हिटॅमिन ई असलेल्या मॉइश्चरायझरचा वापर करा. आपण कोरफड जेल देखील वापरू शकता. यामुळे त्वचा निरोगी राहील.
पुरुष घरबसल्या स्क्रब वापरू शकतात. यामुळे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.
स्क्रब वापरल्याने चेहऱ्यावरील मुरुमाच्या समस्या दूर होतात आणि आपला चेहरा स्वच्छ राहतो.