Marathi News Photo gallery This marathi actress freezed her eggs for baby planning talks about body change harmonal imbalance
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केले ‘एग्ज फ्रीज’; बेबी प्लॅनिंगविषयी म्हणाली..
नेहा पेंडसेनं जानेवारी 2020 मध्ये बॉयफ्रेंड शार्दुल सिंग बयासशी लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती बेबी प्लॅनिंग आणि एग्झ फ्रिजिंगबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. नेहा पेंडसेच नव्हे तर इतरही काही सेलिब्रिटींनी आपले एग्झ फ्रीज केले आहेत.
1 / 7
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि 'भाभीजी घर पर है' या मालिकेत 'अनीता भाभी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा पेंडसे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'एग्ज फ्रिजिंग'बद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. नेहाने 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की आजही अशी अनेक कुटुंब आहेत, जी उशिरा आई बनण्याच्या प्रक्रियेचा स्वीकार करतात, पाठिंबा देतात.
2 / 7
"आपल्या समाजात बऱ्याच महिलांना आई बनण्याविषयीच्या निर्णयाबद्दल विचारलं जात नाही. मातृत्वाच्या गोष्टी त्यांच्यावर फक्त थोपवल्या जातात. सुदैवाने माझ्या कुटुंबात असं काही नाही. आई कधी व्हावं याचा पूर्णपणे निर्णय मी माझ्या इच्छेनुसार घेऊ शकते. त्याला कुटुंबीयांचाही पाठिंबा आहे", असं नेहा म्हणाली.
3 / 7
"जर तुम्हाला आई होण्याचा निर्णय उशिरा घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचे एग्ज फ्रीज करू शकता. ही प्रक्रिया इतकी महागडी नाही. परंतु तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावं लागतं", असं तिने सांगितलं.
4 / 7
याविषयी नेहा पुढे म्हणाली, "तुम्ही जेव्हा 28 ते 30 वर्षांचे असाल तेव्हा एग्ज फ्रीज करून ठेवून द्या. मी ते करण्यात खूप विलंब केला. आई कधी व्हावं, करिअरवर लक्ष केंद्रीत करावं का या सर्व गोष्टी महिला एग्ज फ्रीज करून आरामात ठरवू शकतात."
5 / 7
"मला माझ्या वयाच्या तिशीत आई व्हायचं होतं. का, तर कारण माझं वय वाढत जात होतं. पण त्यावेळी माझं लग्नसुद्धा झालं नव्हतं. माझ्या आयुष्यात त्यावेळी कोणी असता तर मी नक्कीच आतापर्यंत आई बनले असते. पण कदाचित नंतर त्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला असता", अशा शब्दांत नेहा व्यक्त झाली.
6 / 7
"आई होण्याबद्दल मी अद्याप निर्णय घेऊ शकले नाही. कधी-कधी इच्छा होते, पण मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे तयार नाही. मी बाळाकडे पूर्ण वेळ लक्ष देऊ शकणार नाही. म्हणूनच मी त्या निर्णयाबद्दल अद्याप संभ्रमात आहे. मला सध्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे", असंही नेहाने सांगितलंय.
7 / 7
वयानुसार होणाऱ्या शारीरिक बदलांबद्दल नेहा पुढे म्हणाली, "मला याची कल्पना आहे की माझ्या शरीरात बदल होत आहेत. जसजसं वय वाढतंय, तसतसा माझा बायोलॉजिकल क्लॉक बदलतोय. त्या गोष्टींशी माझं शरीर सतत लढा देतंय. म्हणूनच मी एग्ज फ्रीज केले आहेत. मी ज्यावेळी पूर्णपणे तयार असेन, तेव्हा बेबी प्लॅनिंग करेन."