‘या’ वनस्पती सापांसाठी विषासारख्या; वास आला तरी घाबरून लांब पळून जातात
साप म्हटलं की सगळेच घाबरतात पण तुम्हाला माहितेय का की सापही काही गोष्टींना प्रचंड घाबरतात. त्यांचा वास जरी आला तरी ते लांब पळून जातात. पाहुयात नेमक्या त्या कोणत्या गोष्टी आहेत.
1 / 7
मगवॉर्ट: ही एक बारमाही वनस्पती आहे. ही वनस्पती सापांना अजिबात आवडत नाही. कारण तिचा खूप स्ट्राँग सुगंध असतो ही वनस्पती सापांसाठी विषासारखी आहे. सापांना या वनस्पतीची उपस्थिती आवडत नाही आणि ते तिथे जाणं टाळतात.
2 / 7
गवती चहा म्हटलं की आपल्यासाठी चहाची लज्जत वाढवणारा पण सापांसाठी मात्र सर्वात नावडती वनस्पती. गवती चहाचा वास सापांना आवडत नाही त्यामुळे तिथे येणं ते टाळतात.
3 / 7
लसूण : लसूण प्रत्येकाच्या घराच असतोच. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या लसूणमध्ये सल्फोनिक ॲसिड असते ज्याचा वास तीव्र असतो आणि सापांना हा वास अजिबात आवडत नाही. तसे पाहाता लसणाचे रोप घरी लावणे पुरेसे नाही. लसूण मीठात मिसळून त्याची पेस्ट बनवून ती दाराला किंवा उंबऱ्याला लावल्यानेही साप दूर राहतात.
4 / 7
सोसायटी लसूण: या गवता सारखं झाड सुमारे एक फूट उंच वाढतात. सोसायटी लसूण हे बारमाही वनौषधी आहे जे गुठळ्यांमध्ये वाढते. नाजूक, नळीच्या आकाराची, ताऱ्याच्या आकाराची फुले एक फूट उंच गवताळ पर्णसंभारावर असतात. प्रत्येक क्लस्टरमध्ये आठ ते 20 फुले असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वनस्पती थंड आणि उष्णता दोन्ही ठिकाणी वाढते. ही वनस्पतीही सापांना आवडत नाही.
5 / 7
कांदा: कांद्यांमध्ये सल्फोनिक ऍसिड असते.त्यामुळे कांद्यांचा वास हा अतिशय स्ट्रॉंग असतो. त्यामुळे अनेक सर्प तज्ज्ञ घरी कांद्याची रोपे लावण्याची शिफारस करतात, तसेच काहीजण कांद्याची पावडर मीठात मिसळून घराभोवती त्याची फवारणीही करतात.
6 / 7
Mother in Law's Tongue या झाडाला सासूची जीभ देखील म्हणतात. या वनस्पतीला तिचे नाव तिच्या लांबलचक पाणांमुळे पडले आहे जी जीभेसारखी तीक्ष्ण आणि नाजूक असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सापांना या वनस्पतींचे स्वरूप आवडत नाही त्यामुळे ते त्यांच्यापासून दूर राहतात. ही वनस्पती एक प्रभावी सर्पविरोधक मानली जाते.
7 / 7
सर्पगंधा (Serpentine) : आयुर्वेदिक तज्ञांच्या मते या वनस्पतीमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म आहेत. या वनस्पतीच्या मुळांचा रंग पिवळा किंवा तपकिरी असतोआणि त्याची पाने चमकदार हिरव्या रंगाची असतात. सर्प तज्ज्ञांच्या मते, या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव सॅवुल्फिया सर्पेन्टिना आहे. या वनस्पतीचा वास इतका विचित्र आहे की त्याचा वास आल्यावर साप पळून जातात.