टीव्हीची ‘ही’ अभिनेत्री बनणार ‘बिग बॉस ओटीटी 3’ची सर्वांत महागडी स्पर्धक? मागेल ती फी देण्यास निर्माते तयार?

| Updated on: May 01, 2024 | 10:47 AM

बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनच्या यशानंतर आता तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची अधिकृत घोषणा निर्मात्यांकडून येत्या काही दिवसांत केली जाईल. त्यापूर्वी यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

1 / 5
'बिग बॉस' हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. लवकरच 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक भाग घेणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. अशातच अशा एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची चर्चा होतेय, जी या सिझनची सर्वांत महागडी स्पर्धक बनू शकते.

2 / 5
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिवांगी जोशी आहे. शिवांगी ही बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये सर्वांत महागडी स्पर्धक ठरू शकते. कारण निर्मात्यांनी स्वत: तिला शोची ऑफर दिली आहे.

3 / 5
शिवांगीला बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम देण्यासही निर्माते तयार आहेत, असं समजतंय. यावर अद्याप शिवांगीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तिच्या नावाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. 'बिग बॉस ओटीटी 3'ची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही, मात्र निर्माते लवकरच प्रेक्षकांना सरप्राइज देतील, असंही कळतंय.

4 / 5
शिवांगी जोशीशिवाय यंदाच्या सिझनसाठी विकी जैन, मेक्सटर्न, शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, शिझान खान, अरहान बहल यांचीही नावं चर्चेत आहेत. यापैकी विकी जैन हा अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आहे. 'बिग बॉस 17'च्या अंतिम फेरीपर्यंत तो पोहोचला होता.

5 / 5
बिग बॉस ओटीटीचे पहिले दोन सिझनसुद्धा चांगलेच चर्चेत होते. पहिल्या सिझनमध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील लव्हस्टोरीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. तर दिव्या अग्रवाल या सिझनची विजेती ठरली होती. दुसऱ्या सिझनमध्ये फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्यात रोमान्स पहायला मिळाला. युट्यूबर एल्विश यादव या सिझनचा विजेता ठरला होता.